खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बेंबळा बु येथील 14 वर्षीय मुलीचा गावातीलच युवकाने विनयभंग केल्याची घटना दि 5 जानेवारीला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीच्या मोठया पुलावर घडली.
बेंबळा बु येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी हि काल 5 जानेवारीला खल्लार अंजनगाव मार्गावरील चंद्रभागा नदीच्या मोठया पुलावरुन घरी जात असताना आरोपी आकाश सुखदेव कांबळे याने मुलीचा विनयभंग केला.
सदर घटनेची तक्रार मुलीने खल्लार पोलिसात दाखल केली असुन फिर्यादी मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी आरोपी आकाश कांबळे विरुध्द कलम 354,354(अ),(ड),सहकलम 8,12पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे करीत आहेत.