दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथे पत्रकार दिनानिमित्त आळंदी नगरपरीषदेत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. सहा जानेवारी रोजी मराठीतील पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू झाले,यानिमित्त दर्पण वृत्तपत्र सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले जाते व सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आळंदी नगरपरीषदेत नवनिर्वाचित मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून प्रथमच पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आळंदी नगरपरीषद सभागृहात पत्रकार महादेव पाखरे, श्रीकांत बोरावके, हमीद शेख, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, ज्ञानेश्वर फड आणि दिनेश कऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आळंदी नगरपरीषदेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी आळंदी नगरपरीषदेचे प्रशासकीय अधिकारी किशोर तरकासे यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.