नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथे तब्बल ३२ वर्ष सेवा देणारे प्रयोगशाळा परिचर नरेश घोनमोडे नुकतेच सेवानिवृत्त झाले. सर्वांशी हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना निरोप देतांना बोदरा येथील शिक्षकवृंदही भावूक झाले होते. संस्थेचे सचिव मा. होमराज पाटील कापगते यांनी नरेश घोनमोडे यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देत सत्कार केला. प्रसंगी वामनराव डोंगरवार, जासवंत कापगते, राजेश सुर्यवंशी, प्राचार्य पुरूषोत्तम मुंगमोडे, दामोधर काळे, प्राचार्य अर्चना बावणे, प्रा. ब्राम्हणकर, प्रा. नाकाडे आणि सर्व उपस्थित शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी घोनमोडे यांना पुष्पगुच्छ देत आभार मानले. साकोलीतही पहाट मित्र मंडळ वतीने नरेश घोनमोडे यांचा शाल श्रीफळ देत सत्कार केला यात दिवाकर रामटेके, दिलीप मासूरकर, प्रा. ठाकूर सर, मनोहर मस्के हे हजर होते.