दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत 7822082216
आरमोरी
तालुक्यातील कोजबी येथे दी. 3=01=2023मंगळवार रोजी जि.प.उच्च शाळा
कोसबी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोजबी गावच्या सरपंच मा.सौ.कविताताई ताडाम आणि उद्धघाटक म्हणून मा.दिनेशजी बनकर अध्यक्ष शा.व्य.समीती यांची उपस्थिती होती.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ब्राम्हणे मडम धोटे मॅडम, व ग्रामपंचायत कोजबी येथील संपूर्ण ग्रामपंचायत सदश गन ,माधुरीताई सहारे पो.पाटील,अनुरथा मुल्लेवार ,श्यामलता घोडाम अंगणवाडी सेविका, गुलाब ताडाम सोनटक्के सर मु.अ.कोसबी चौधरी सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर पाहुण्यांचे स्वागत केले.संचलन चौधरी सरानी केले.प्रास्तविक मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सोनटक्के सर यांनी केले मा.दिनेशजी बनकर यांनी सावित्री बाई
फुले यांच्या जीवना वरती प्रकाश टाकून विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषण केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चवधरी सर यांनी मानले यानंतर श्यालेय विद्यार्थांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.