ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. 05 : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा गडचिरोली या कार्यालयास प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने, गडचिरोली चामोर्शी रोडवरील संशयीत अवैध सावकार योगेश महेंद्र रणदिवे यांचे प्रतिष्ठानावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये विद्यमान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा गडचिरोली व्ही. पी. सहारे यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुण दिनांक 03 डिसेंबर 2024 रोजी सहकार विभागाने धाड् टाकली.
सदर धाडीमध्ये अनेक आक्षेपीत तथा नियमबाहय दस्तऐवज / कागदपत्रे (कोरे चेक, मुळ करारनामे, पैशाचे बदल्यात मालमत्ता खरेदी करारनामा इत्यादी) आढळून आलेली असुन, ती पुढील नियमबाहय कारवाई करीता जप्त करण्यात आलेली आहे.
सदर धाडसत्रात पथक प्रमुख एच. जी. सौलाख, तथा कर्मचारी डी. एस. बनसोड, हेमंत जाधव, प्रशांत गटकोजावार, सौ. अनिता हुकरे, एस.एम. वैद्य तथा पोलीस कर्मचारी यांनी मदत केली. तसेच सदर धाडीमध्ये जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रासंबंधाने अधिक चौकशी तथा पुढील कायदेशीर कार्यवाही करीता चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली.
असुन, सदर समिती सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन पुढील कारवाई सदर समिती करणार आहे. तसेच, बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली तसेच तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विक्रमादित्म सहारे यांनी केले आहे.