तहसिलदार,उपविभागीय पोलिस अधिकारी,पोलिस निरीक्षक यांनी गदगाव प्रकरणातंर्गत भेदभाव केल्याने बौद्ध बांधवांनी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी :- विनोद खोब्रागडे संविधान अभ्यासक.‌ — गावातील सर्व शासकीय योजना बंद व्हायला हव्यात..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादीका 

      पक्षपात व भेदभाव केल्यामुळे चिमुर तहसीलदार,उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर,चिमूर ठाणेदार, गटविकास अधिकारी प.स.चिमूर,सरपंच,पोलिस पाटील,व इतरांवर मौजा गदगाव बौद्ध बांधव यांनी अट्रासिटीच्या कलमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करन्याची मागणी संविधान अभ्यासक विनोद खोब्रागडे (वरोरा) यांनी प्रेस नोट द्वारे केली आहे.

         तसेच गदगाव ग्रामपंचायतला शासन स्तरावरुन मिळणाऱ्या शासकीय योजना बंद करण्याची मागणी गदगाव येथील बौद्ध बांधवांनी शासनाकडे करावे असे सुचक विधान विनोद खोब्रागडे यांनी प्रेस नोट द्वारे केली आहे.

          ज्याअर्थी मौजा गदगाव येथे अनेक हिंदूचे मंदिर अतिक्रमण जागेवर बांधलेले आहेत,तसेच बौद्ध वाड्यात सुद्धा बौद्ध समाज बांधवांनी आबादीच्या जागेवर अतिक्रमण करून अनेक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करीत असतात..

       महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५१ नुसार अतिक्रमण जागा नियमानुकूल करन्यासाठी तहसीलदार चिमुर यांना अनेक वर्षांपासून बौद्ध बांधव मागणी करीत होते,मात्र तहसीलदार चिमुर यांनी जानीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे,ही बाबच भेदभाव करणारी आहे असेही संविधान अभ्यासक विनोद खोब्रागडे यांचे मत आहे‌.

       बौध्द बांधव यांनी बौद्ध समाज उपयोगी जागा अतिक्रमण केली होती,हि बाब काही हिन्दू बांधवांना खटकली व त्यांनी सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी परवानगी न घेता मोर्चा काढला होता.

          महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी दिनांक ३/१२/२०२४ रोजी सदरचे पंचशील झेंडा व तथागत गौतम बुद्धाची मूर्ती,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची परवानगी न घेता हटविली व बौद्ध बांधवांचा भावना दुखावल्या,व महसूल अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर अट्रासिटीच्या कलमानुसार फौजदारी कारवाई करावी अशी मागणी गदगाव बौद्ध समाज बांधवांनी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

******

     संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर..‌

९८५०३८२४२६.. 

८३२९४२३२६१..