अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी..

युवराज डोंगरे,खल्लार..

        उपसंपादक 

        खल्लार परिसरात मागील आठवड्यात अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

            खल्लार परिसरात मागिल आठवड्यात तिन चार दिवस रात्रीच्या दरम्यान विजाच्या कडकडासह धो-धो अवकाळी पाऊस मोठया प्रमाणात झाला.त्यामुळे कपाशी,तूर,हरभरा यासह सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

         पावसाने पेरणी वेळी घेतलेली विश्रांती,पिकाच्या वाढीच्या व आवश्यक वेळी पावसाने दिलेली दांडी यामुळे शेतकरी चिंतेत होते.

       त्यानंतर मेघगर्जनेसह अवकाळी बरसला व वेचणीला आलेला कापूस शेतकऱ्याच्या डोळ्या समोर घरी न येता पावसात भिजून गेला.कृषि सेवा केंद्राचे रुपये देणे व लागलेल्या मशागतीची मजुरी देणे ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे..

         शासनाने झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

***

कोट :-

    अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या पिक नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करावेत.अन्यथा सर्व शेतकरी हे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतील..

    अंकुश भाऊराव रहाटे

शेतकरी तथा सदस्य ग्रामपंचायत मोचर्डा(म्हैसपूर)