कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
पारशिवनी तालुक्यात २८४ अंगणवाड्या आहे.४ डिसेंबर पासून ३०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे.त्या अनुषंगाने वेतनश्रेणी,भविष्य निर्वाह निधी,मानधन वाढ आणी पेन्शन योजना लागू करावी,शासकिय कामांकरिता मोबाईल,बालकांना मिळणाऱ्या दरात वाढ,सामाजिक सुरक्षा,अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये तर मदतनीस यांना २० हजार रुपये मानधन देण्यात आले पाहिजे.
मानधनात १०० ला ७५ असे प्रमाण असावे.बिना योगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात यावा,आहाराच्या दरात वाढ करण्यात यावी,अशा प्रकारच्या मागण्या आहेत.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आस्वासनाची पुंरतता महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे पारशिवनी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाईलाजाने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे,असे महाराष्ट्र राज्य अंगनवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष सौ.सुनीता मानकर यांनी सांगितले.
यावेळी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या सौ.उषा अनिल साहरे,जिल्हा सचिव सौ.राधिका चव्हाण,सौ.मालतीताई नारायण खोब्रागडे,आशा ढोगे,बेबी ढोरे,दुर्गोताई मोटघरे,मायाताई कठाडे,सह तालुक्यातील सर्व ४ सर्कल मधील २०० पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
***
चंद्रपालजी चौकशे..
पर्यटन मित्र.सरपंच संघटना अध्यक्ष महाराष्ट्र,रामधाम संस्थापक,बेटी बेटा बचाव नशा हटाव अभियानाचे प्रमुख चंद्रपाल चौकसे यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना भेटून काम बंद आंदोलनाला आपला १०० टक्के पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
***
१८ डिसेंबर २०२३ ला राज्यव्यापी विशाल मोर्चा निघणार..
आल इंडिया ट्रेड युनियन महाराष्ट्र अध्यक्ष श्यामजी काळे यांच्या नेतृत्वात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातंर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सौ.सुनिता मानकर यांनी सांगितले.
यावेळी चंद्रपालजी चौकसे अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
***
ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी होणार कुपोषित..
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा फटका आता पारशिवनी तालुक्यातील २८४ अंगणवाडी मध्ये दाखल हजारो बालकांना व गरोदर मातांना बसणार आहे.
अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना व स्थंनदा मातांना सकस आहार व पुरक आहार देण्यात येते.
पण आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम बंद आंदोलन हे बेमुदत असल्याने व मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याने,ग्रामीण आदिवासी भागातील अंगणवाड्या अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत.यामुळे हजारो बालकांना सकस आहारापासून वंचित राहावे लागणार असल्याने कुंपोषन वाढणार असल्याची भिंती वर्तविण्यात येत आहे.
***
यशोदा बनून मांतृत्वाचा स्विकार करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना न्याय कधी?
पंचायत समिती पारशिवनी सभापती सौ.मंगलाताई नीबोंने यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली व मागण्याचे निवेदन स्वीकारले आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.
सभापती सौ मंगला नीबोंने यांनी सांगितले की देवकी नंदनाला सांभाळ केला.अंगणवाडी सेविका व मदतनीस या आजच्या यशोदा माता असुन सुद्धा त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आणणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध यावेळी सभापती सौ मंगला नीबोंने यांनी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काम बंद बेमुदत आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.