युवराज डोंगरे/खल्लार

        अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची सभा सायन्स कोर शाळा, अमरावती येथे नुकतीच पार पडली

. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हा अध्यक्ष पंडितअण्णा देशमुख होते. व्यासपीठावर किरण पाटील जिल्हा सरचिटणीस तथा राज्य उपाध्यक्ष, निळकंठराव यावले, कार्याध्यक्ष तथा माजी संचालक, राजेंद्र होले, जिल्हा कोषाध्यक्ष,संजय नागे संचालक, जि.प.शि.स.बँक, मनोज चौरपगार संचालक जि. प.शि.स.बँक अम. अमोल देशमुख नवनियुक्त सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ सौ. सुनिताताई पाटील अध्यक्ष अखिल महिला आघाडी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले.

त्यानंतर सभेचे कामकाज विषयसुचीप्रमाने पार पडले. 

राज्य संघाच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली, हिवाळी अधिवेशनावर शिक्षकांचे विविध समस्येबाबत मोर्चा काढण्याविषयी चर्चा करण्यात आली.

जिल्हास्तरावरील शिक्षकांचे विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात आली.

 अखिल संघाचे जिल्हा अधिवेशनाच्या आयोजनाबाबत चर्चा करून प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधी कडून जिल्हा अधिवेशनबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या. केंद्रप्रमुख भरती GR दि. 1/12/2022 यातील मुद्दे व यापूर्वी शासनाचे केंद्रप्रमुख भर्तिबाबत ची अधिसूचना यातील विसंगत मुद्दे बाबत चर्चा करण्यात आली. अमोल देशमुख संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे सिनेट मधे निवडून आल्याबद्दल त्यांचा संगटनेतर्फे शाल व श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. शिक्षक सहकारी बँकेत संचालक पदी निवडून आलेले संजय नागे व मनोज चौरपगार यांचा संघटनेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. आदरणीय किरण पाटील यांची निवड राष्ट्रीय आंदोलन त्रिसदस्यीय समिती मधे निवड झाल्याबद्दल संघटनेकडून यथोचित सत्कार करण्यात आला.

जिल्हा संघाचे कार्यकारिणीत शिक्षक बँकेचे संचालक संजय नागे आणि मनोज चौरपगार यांचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्याचा ठराव किरण पाटील मांडला, या ठरावाला सुरज मंडे यांनी अनुमोदन दिले व सभागृहामधे एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालनमकिरण पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन माननीय उमेश शिंदे यांनी केले.

 सभेच्या यशस्वीतेसाठी अखिलच्या शिलेदारांनी सर्वोपरी परिश्रम घेतले.

या कार्यक्रम करिता प्रामुख्याने पंडितराव देशमुख,किरण पाटील निळकंठराव यावले, राजेंद्र होले, सुनीता पाटील, प्रवीण खरबडे, सुरज मंडे, संजय नागे, मनोज चोरपगार, भूषण ठाकूर, सतीश वानखडे, संजय साखरे, मदन उमक, सतीश गुजरकर, वृषाली देशमुख, गजानन निर्मळ, प्रमोद लाडोले, प्रफुल ढोरे, देविशिंह चव्हाण, प्रफुल्ल भोरे, राजेंद्र सावरकर, पवण बोके, अरुण देशमुख, महेश पवार, शेख शकील, प्रदीप गणोरकर, अशोक चव्हाण, प्रशांत भगेवार, जितेंद्र गहेलवार, राजेंद्र मालोकार, सतीश उके, मंगेश वाघमारे, अनिल माहुलकर आणि यांचेसह जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य तसेच तालुका संघाचे अध्यक्ष, सरचिटणीस तथा तालुका कार्यकारणी सदस्य आणि जिल्हाभरातून आलेले सामान्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com