अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- पीक लागवडीसाठी ट्रॅक्टर द्वारे शेतीची मशागत करताना रोटावेटर मध्ये सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आरमोरी तालुक्यातील वडधा नजीकच्या एका शेतात रविवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत युवकाचे शीर धडा वेगळे झाले.
अंकुश रामभाऊ दोडके वय 29 देलोडा खुर्द असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
अंकुश दोडके हा वडधा येथील राजेंद्र ठाकूर यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो रविवारी एम एच 33 एफ 4765 या क्रमांकाचे ट्रॅक्टर चालविण्यासाठी गेला होता.
रविवारी वडधा- खरपी मार्गावरील नाल्यालगत असलेल्या परसराम सयाम यांच्या शेतात ट्रॅक्टरला रोटावेटर जोडून मशागतीचे काम सुरू होते. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात घडला.
सदर अपघातात अंकुशच्या चेंदामेंदा होऊन शीर धडा वेगळे झाले . एक पाय सुद्धा तुटला . विशेष म्हणजे एका बांधीत मृताचे प्रेत होते .तर दुसऱ्या बांधित ट्रॅक्टर उभे होते. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक शंका आहेत.