वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र अमरावती आणि वाशिम अंतर्गत दि.४/१२/२०२२ रोजी ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलेल्या दर रविवारी चला जाऊ मैत्रीच्या दुनियेत या कार्यक्रमांमध्ये पारवा गावातील सरपंच मा.रोशन चव्हाण मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती मा.चंद्रशेखर डोईफोडे (जि.प सदस्य वाशिम) कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्र ते सरपंच बनणे पर्यंत ची कहाणी रोशन चव्हाण यांनी सांगितली.त्यामध्ये बोलत असताना मी जर अनुभव शिक्षा केंद्राशी जोडलं नसतो तर आज सरपंच झालो नसतो अशी भावना बोलत असताना व्यक्त केले.प्रत्येक युवकांनी अनुभव शिक्षा केंद्र हा प्रकल्प प्रत्येकाने समजून घेऊन स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करावा असे आव्हान युवकांना करण्यात आले.या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता.या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये रोशन चव्हाण यांना प्रश्न विचारून राजकीय क्षेत्रामध्ये कशाप्रकारे करिअर घडवलं अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा कमिटी यांनी आयोजन केले होते.अनुभव शिक्षा केंद्राचे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार गोपाल भिसडे यांनी मानले.अशा प्रकारे हा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला….