चिमूर विधानसभेतील चार उमेदवारांची माघार…

 

        रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

     चिमूर ७४

विधानसभा क्षेत्राचे प्रतीनीधीत्व करता यावे यासाठी एकुण २५ व्यक्तीनी नामाकंन दाखल केले होते.त्यात ४ नामांकन रद्द करण्यात आले तर ३ उमेदवार बाद झाले होते.

      त्यामुळे रिंगणात एकुण १७ उमेदवार होते. दि. ४ नोव्हेबरला अँड.हेमंत सुखदेव उरकुडे,योगेश नामदेव गोन्नाडे,धनराज रघुनाथ मुंगले,डॉ.प्रकास नक्कल नान्हे या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता १३ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

      निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार डॉ.सतिश मनोहर वारजुकर भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस,लक्ष्मण भाऊराव दांडेकर,किर्तीकुमार मितेश भांगडीया भारतीय जनता पार्टी,अरविंद आत्माराम सांदेकर वंचीत बहुजन आघाडी,निकेश प्रल्हाद रामटेके बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी,अमीत हरीदास भिमटे आझाद समाज पार्टी,नारायण दिनबा जांभुळे स्वाभीमानी पक्ष,अनिल अंबादास धोंगडे अपक्ष,कैलास श्रीहरी बोरकर अपक्ष,मनोज उद्धव मडावी अपक्ष,रमेश बाबुराव पचारे अपक्ष,केशव सिताराम रामटेके अपक्ष,जितेन्द्र ठोंबरे असे एकुण १३ उमेदवार चिमुर विधानसभेच्या रिंगणात आहेत.

       आज नामांकन अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर चिमूर विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

        चिमूर मतदार संघात काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी धनराज मुंगले यांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने थोपविण्यात काँग्रेसला यश आले आहे.