खऱ्या आदिवासींवर (अनुसूचित जमाती) अन्याय होऊ नये म्हणून उमेदवारीतून माघार.. — माधुरी मडावी यांची पत्रपरिषदेत माहिती..

पंकज चहांदे..

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत..

देसाईगंज:-

           अनसुचित जमाती करीता राखीव असलेल्या ६७ आरमोरी विधानसभा क्षेत्रात खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ नये म्हणून आरमोरी विधानसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याची माहिती माधुरी मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

          पत्रपरिषदेत माहिती देतांना माधुरी मडावी पुढे म्हणाल्या की,६७-आरमोरी विधानसभा क्षेत्रासोबत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्र,चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र हे अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) समाजाकरीता राखीव आहे. 

          या विधानसभा क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणारा उमेद‌वारी हा खरा व अस्सल आदिवासी असायला पाहिजे.परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले व गेल्या १० वर्षापासून आरमोरी विधानसभेचा प्रतिनिधीत्व करीत असलेले कृष्णा गजबे हे बोगस आदिवासी म्हणजेच माना जमातीचे आहेत. 

        त्यांच्याकडे असलेले प्रमाणपत्र हे घटनाबाह्य आहेत.असे असतांनाही ते गेल्या दोन दशकांपासून अनु. जमातींचे घटनात्मक सवलतींचा लाभ घेत आहेत.

        क्रिष्णा गजबे व इतर माना जात समुहास निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र हेच असंविधानिक असल्याने त्यांच्या त्या जात प्रमाणपत्रांवर मी स्वतः आरमोरी विधानसभा क्षेत्राची उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करतांनाच दि. २९ ऑक्टोंबर २०१४ ला संपूर्ण पुराव्यानिशी मा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्याकडे आक्षेप नोंदविला होता. 

          बोगस आदिवासी असलेले कृष्णा गजबे यांचे घटनाबाह्य जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केल्याने,खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून मी ६७-आरमारी विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत माघार घेत असल्याची माहिती माजी उपायुक्त माधुरी मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.