३० नोव्हेंबर पुर्वी सादर करावा हयातीचा दाखला… — सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांना मनपाचे आवाहन…

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

               वृत्त संपादिका 

चंद्रपूर दि. ०५ नोव्हेंबर :- 

            चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांनी त्यांच्या हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपुर्वी मनपा लेखा विभागात सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    हयातीचा दाखला हा भारतीय स्टेट बँक चंद्रपूर येथील मुख्य शाखेतुन प्रमाणित केलेला असावा तसेच हयातीचा दाखल स्वप्रमाणीत करून त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक नमुद असणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड व पॅनकार्डची छायांकीत प्रत ( झेरॉक्स ) जोडण्यात यावी.

               हयात प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी मनपा लेखा विभागास प्राप्त न झाल्यास पुढील पेन्शन रोखण्यात येणार असल्याने दिलेल्या मुदतीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.