महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना हे लक्षात ठेवा….  — भाग ३…. 

 

      लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……

       तर ती आमच्या व येणाऱ्या पिढीच्या कायम सर्वांगीण उन्नतीसाठीची प्रक्रिया असते..

मजूरवर्ग….

    अर्थात दररोज मातीकाम किंवा हाताला मिळेल ते काम करुन जगण्याची धडपड करणारा वर्ग म्हणजे मजूरवर्ग….

           या देशात लोकशाही आहे म्हणतात,लोकशाहीत सर्वाना जगण्यासाठी समान संधी,विकासाची समान संधी आहे म्हणतात,तर मग देशाच्या स्वातंत्र्यानंतर आलेल्या लोकशाहीत गेल्या 75 वर्षांपासून माझी हलाखीची परिस्थिती अशी का?

        वेगवेगळे राजकीय पक्ष, विविध संघटना गेल्या 75 वर्षात येतात आणि जातात.निवडणुका आल्या की पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे उगवतात आणि लगेच निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे.माझा केवळ वापरच होतोय.माझ्या हाताला दररोज काम मिळत नाही.

       म्हणून मला घर चालवणे अशक्य होत आहे.मुलाबाळांचे आरोग्य व शिक्षण तर सोडाच मी पोटभर त्यांना सकस आहार सुद्धा स्वाभिमानाने काम करुन जगवू शकत नाही.केवळ लाचारीने जगावे लागते.तर हीच लोकशाही आहे….?

        जर स्वाभिमानाने जगताच येत नसेल, हाताला कामच मिळत नसेल,आवश्यक गरजा भागविन्यापुरता मोबदला मिळत नसेल,उलट मला हतबलतेपोटी लोकांना खोटे बोलून फसवावे लागत असेल,प्रसंगी चोरी सुद्धा करावी लागत असेल,आणि ही लोकशाही, सरकार,ही व्यवस्था समजून घेण्यासाठी माझं डोकं चालत नसेल,म्हणून मी जर दारूच्या किंवा मद्यपानाच्या आहारी मी जाऊन माझे संसार मी माझ्या हाताने उध्वस्त होत असेल तर त्यात माझी काय चूक आहे?

         लोकशाहीतील या व्यवस्थेने म्हणजेच केंद्र व राज्य सरकारांनी देशाचा व राज्याचा कारभार गेल्या 75 वर्षात संविधानावर 100% चालवीला असता. 47 क्रमांकाच्या अनुछेदाची 100% अंमलबजावणी केली असती, दारूची निर्मितीच केली नसती,तर आज माझा जो संसार उध्वस्त होत आहे.तो झालाच नसता ना!

        मग माझ्या देशातील स्वातंत्र्यविरांनी,महापुरुषांनी ज्या त्याग आणि बलिदानाच्या संघर्षातून देश घडवीला…

      महागाईमुळे,हाताला काम नसल्यामुळे,मी कर्जबाजारी झालो,वैचारिक संभ्रमात सापडल्यामुळे व्यसनी झालो, म्हणून आत्महत्येच्या उंबरठ्यावर आल्यामुळे माझा संसार उघड्यावर पडण्याची वेळ माझ्यावर जर आली,तर यात माझा लोकशाहीत जगण्याचा दोष तो कोणता?

         माझं व देशाचं आणि राज्याचं वाटोळं या साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीच्या राजकारण्यांनी केलं.या नेत्यांना जे आजपर्यंत आमदार म्हणून अनेक वेळा निवडून गेले,जे त्यांच्या बापाचे झाले नाहीत ते माझे होणार आहेत का?

       अशा रगेल आणि रंगेल उमेदवारांना मी मत देणार नाही. त्याने मला कितीही कोणतेही आमिष दिले किंवा दाखविले,तरी मी अशा मुजोर माजी आमदाराला मतदान करणार नाही.उलट नवीन युवापिढीतील सुशिक्षित,युवक व युवती,मग ते अपक्ष असले तरी हरकत नाही.

      ज्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.जो उमेदवार गेल्या 10 / 15 वर्षांपासून निवडणुकीला उभा राहतो.परंतू त्याला अजूनही संधी मिळाली नाही,त्याने संधी मिळाली नाही म्हणून समाजकार्य सोडले नाही,निस्वार्थपणे काम करतच राहिला.अशाच उमेदवाराला मी मतदान करेन. तेही त्याच्याकडून कसलीही अपेक्षा न करता……

      माझ्या जिवापेक्षाही मोलाचं असलेलं मत मी त्याला देईन….

       मजूरवर्गाचा वरील निर्धार महाराष्ट्र लोकशाहीची दिशा योग्य ठरवू शकतो….

        हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे.आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्यासाठी आहे…. 

       तेंव्हा ही जबाबदारी माझीच आहे आणि मीच याला जबाबदार आहे.म्हणूनच मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मला गुप्त मतदानाचा अधिकार जो माझ्या जिवापेक्षाही मोलाचा आहे.तो मला प्रदान केलेला आहे…..

       तेंव्हा हा मताचा अधिकार मी जबाबदारीने माझ्या देशासाठी,माझ्या लोकशाहीसाठी,माझ्या संविधानासाठी,एवढेच नव्हे तर येणाऱ्या माझ्याच भावी पिढीच्या कायम उन्नतीसाठी पार पाडीन. (हा निर्णय प्रत्येकाने घ्यावा) …..

        मताचा अधिकार ही एक भावी आणि आजची आमची सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य समजून पार पाडावे…..

*****

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या मतदान जागृतीच्या सर्व पोस्ट दररोज आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि मो. नं.असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….

*****

जागृतीचा लेखक आणि आवाहनकर्ता 

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…