ऋषी सहारे
संपादक
आलापल्ली – वंचित बहुजन आघाडीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकित अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात नव्याने पक्ष संघठन मजबूत करण्याबरोबरच सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक समस्यावर विचारमंथम करण्यात आले व आंदोलनात्मक भूमिका घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्याचे सर्वानूमते ठरविण्यात आले. तसेच वंचित असणा-या तळागाळातील लहान लहान समुहा पर्यंत एड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविण्यावर भर देण्यात आला.
या बैठकिच्या अध्यक्षस्थानी अहेरी विधानसभा क्षेत्राचे निमंत्रक रविंद्र बारसिंगे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते, जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, संघटिका मंदाताई तुरे, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, प्रफुल मेश्राम, कुंदा अलोने आदि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी तालुक्यातील पदाधिका-यांकडून पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन, महिला आघाडी संघठन मजबूत करण्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेत लोक प्रतिनीधी निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कल वाईज कमिट्या, तसेच गावागावात ग्राम शाखा व बुथ कमिट्याची बांधणी करण्याचे तसेच पदाची जबाबदारी समजून कार्य करण्याचे आवाहनही केले.
बैठकिला सुरेश उंदिरवाडे, राजू करमे, कल्पना वाघमारे, ईंदिरा करमे, पिंगला उंदिरवाडे, दिक्षा चांदेकर, कविता करमे, अर्चना चांदेकर , सुमन खोब्रागडे, सिंधू तावाडे, अंकिता दुर्गे आदिंसह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.