मुले चोरणाऱ्या टोळी पासून वाचला पिंपरी बुद्रुक यथील 13 वर्षाचा विराज गवळी… — धोक्याच्या प्रसंगी शक्ती नसून युक्तीचा प्रयोग,, तोंडाने चावा घेऊन स्वतःचा बचाव केला .

नीरा नरसिंहपुर दिनांक:4

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 बावडा ते नरसिंहपूर परिसरातील बि. के. बि. एन. राज्य मार्गाने लहान मुले चोरणाऱ्या टोळीचा प्रसार वाढु लागला.तसेच  

आनोळखी व्यक्ती आवाज वेगळा आसणारे पुरुष लहान मुले चोरणाऱ्या टोळीचे आगमन तर दुचाकी वर येऊन  लहान मुले पहताच स्वतः जवळील रुमालाला काहीतरी पावडर आथवा औषध लावून तोच रुमाल मुलाच्या तोंडाला लाऊन घट्ट बांधून धुंद आल्याबरोबर लगेचच विराज गवळीला गाडीवर उचलून घेऊन बावडा मार्ग चोर निघून गेले होते.

 परंतु चोरांचा डाव फसला.?

 ,,होता जीवा म्हणून वाचला शिवा,,,

या म्हणी प्रमाणे,, स्वतःने स्वतःच्या प्रयत्नाने जीव वाचविला.

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील.

          विद्यार्थी विराज राजेंद्र गवळी वय वर्ष 13 इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत आहे. सदर सुट्टी दिवशी गावच्या बाजूस पश्चिम दिशेला वेल्डिंगच्या दुकाना लगत रस्त्याच्या कॉर्नरला खेळत आसताना आचानक दोन चाकी रेड कलरची गाडी वेगात बावडा मार्गे धावत आली.व विराज गवळी जवळ उभी राहून त्याला पकडले.व वेगाने विराज गवळीला तोंडाला रुमाल बांधून त्याला गाडीवर उचलून घेऊन गेली.

         त्याच बरोबर विराजला धुंद आली व धुंदीत काही समजले नाही. आपण कोठे आहेत तेही कळेना बावडा गावा पर्यंत गाडी वेगाने गेली वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची होती. त्या गाडीने बावडा पास केल्यानंतर बावडा ते लाखेवाडी रस्त्याने वेगात जात आसताना आचानक बावडा गावातील गतिरोधक वर गाडी आदळल्या बरोबर तोंडावरचा बांधलेला रुमाल खाली आला व जोरात रागाने विराज आरडाओरडा करू लागला चोराच्या हाताला चावला त्याच बरोबर मुले चोरणाऱ्या चोरांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी विराज गवळीला लगेचच गाडीवरून त्याच ठिकाणी बाजूस फेकून खाली दिले. व भर धावाने गाडी लाखेवाडी मार्गे निघून गेली.

           विराजचे धाडस जीव वाचवण्यासाठी चोराच्या हाताला चावा घेतला त्या विराज कडे शक्ती नसून युक्तीचा प्रयोग करून सुटका करून घेतली. बावडा गावा शेजारी लगेचच घाबरत दुकान दाराला सर्व काही घडलेला वृत्तांत सांगितल्याने त्या दुकान दाराने पिंपरीला लगेच त्याचा मामा वैभव दादासाहेब सूर्यवंशी यांना फोन द्वारे सूचना करून बोलवून घेतले सदर ही माहिती वैभव सूर्यवंशी मामा यांना कळाल्या नंतर बावडा नजीक आसलेले पोलीस स्टेशन मधे जाऊन पोलीस अधीकारी साहेबांना घडलेला प्रकार सर्व काही सांगितला.

         लगेच तातडीने पोलीस अधिकारी यांनी निर्णय घेऊन त्या चौकशीसाठी पिंपरीला येऊन ज्या ठिकाणी विराजला उचलून घेऊन गेले त्या जागेवरची पाहणी केली. इथून पुढे पालक यांनी सतर्क राहून आपली मुले स्वतः लक्ष ठेवून वेळेत शाळेला पोहोच करा व शाळा सुटल्यानंतर हाजर राहून आपली स्वतःची मुले स्वतःच घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांना व पालकांना सूचना दिल्या. लहान मुले चोरनारी टोळी प्रथमच या भागात कशी आली याची पुढील चौकशी चालू आहे.

          या सर्व भागात आसो आथवा परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुले चोरून नेणारी टोळीचा तपास करून सतर्क व सज्ज राहण्यासाठी ग्रामस्थांनी जागृत राहावे असे आव्हान यावेळी करण्यात आले. प्रत्येक भागातील ग्रामस्थांनी आपापल्या भागामध्ये अनोळखी व्यक्ती आसल्यास पूर्ण खात्री करून विश्वास संपादन करावा.