अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ कडून वासुदेव मेमनकर यांचा सत्कार…

युवराज डोंगरे /खल्लार 

        उपसंपादक 

 जि. प. पूर्व माध्यमिक मराठी शाळा निंभारी येथिल वासुदेव मेमनकर शाळेवरुन सेवा निवृत्त झाले. त्यानिमित्याने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दर्यापूर च्या वतीने वासुदेव दामोधर मेमनकर उभयतांचा शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 त्यांची सेवेची सुरुवात 1990 ला चिखलदरा पंचायत समिती येथून झाली.त्यानंतर त्यांनी दर्यापूर मधिल राजखेडा, धारणी मधील गोलाई, पुन्हा दर्यापूर मधील गायवाडी, शिगंणापूर (मुले ) शेवटी निंभारी ला 30 सप्टेंबरला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले.

           वासुदेव मेमनकर यांचा सत्कार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावतीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे, यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक संजय नागे, अखिल शिक्षक संघाचे तालुका सरसिटणीस डी. आर. जामनिक, कोषाध्यक्ष राजू सावरकर,सामदा केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक चव्हाण, गजानन गणोदे, प्रमोद कुरळकर, कैलास डहाळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.