युवराज डोंगरे यांना मातृशोक… 

कार्यालयीन प्रतिनिधी 

          दखल न्युज भारतचे उपसंपादक, खल्लार येथिल पत्रकार युवराज डोंगरे तथा डायमंड इंग्लिश स्कुल चंद्रपूरचे संस्थापक नंदलाल डोंगरे यांच्या मातोश्री गंगुबाई नथुजी डोंगरे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि 4 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास निधन झाले.

           त्यांच्यापश्चात दोन मुले, सून, नातवंड असा आप्त परिवार असून त्यांच्यावर चंद्रपूर येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता.