टाकरखेडा मोरे – कापूसतळणी ते डोंबाळा मार्गाकरिता रस्ता रोको आक्रोश आंदोलन…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक 

      टाकरखेडा मोरे, कापूसतळणी ते डोंबाळा मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गाने अंजनगावसुर्जी ते कापूसतळणी मार्गे अमरावती व दर्यापूर एसटी बसेस सुरू आहेत. या मार्गावरील खड्ड्यातून वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते.

           या मार्गाची दुरावस्था झाली असून या मार्गावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या मार्गाने अनेक अधिकारी व पदाधिकारी जाणे येणे करतात. परंतु हा मार्ग दुर्लक्षितच असल्याने जनतेने पोही फाट्यावर निर्मला विद्यालयाच्या गेटजवळ दि.4 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको जन आंदोलन केले.

           सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अघम यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली व सदर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदीकरण करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्याने पाठविण्यात येईल.

         तसेच सदर काम मंजुर झाल्यास त्वरित काम पूर्ण करण्यात येईल व सद्यस्थितीत डांबरी खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे काम युद्ध पातळीवर पुर्ण करण्यात येईल असे लेखी पत्र भुमी फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष चिंचोळकर यांना दिले असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन पूर्ती न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले जात होते.

          या रास्ता रोको जन आक्रोश आंदोलनांचे नेतृत्व भुमी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष चिंचोळकर यांनी केले या आंदोलनात जावेद अहेमद शेख ईसा, वसंत बानाईत, सत्यशील लव्हाळे, मिथुन शेवाळे, अनीस खा मियां खा, राहुल बाबनेकर, संजय तायडे, संजय काळपांडे, प्रशांत सरदार, चेतन बाबनेकर, वैभव चिंचोळकर, हर्षल भड, अमन भाई, गुडृडु भाई, बाबा, वसीमभाई, नम्मुभाई, अनील फरकुंडे, संजय विभुते, प्रभुदास तायडे, अंकुश मळसने, राहुल भागवत, राजेश खडसे, भुषण भागवत, श्रीकांत खोडे, प्रदीप बिजागरे, सागर मळसने, मोहन नवले, रवी निवाणे, किशोर वाकपांजर, सुशील फरकुंडे, प्रविण हिंगे, निलेश वर्हेकर, पंकज ठाकरे, संदीप रावले, प्राचार्य हैदरिया ऊर्दू हायस्कूल मोहसीन अहमद, सरपंच अक्षता खडसे, प्रतीक मळसणे, किशोर खडसे, कसबेगव्हानचे सरपंच शशिकांत मंगळे, गजानन शिंगणे, गोपाल खलोकार व समस्त कापुसतळणी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.