ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. ०५ : दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने जनजागृतीपर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वन्यजीव विषयी लोकांमध्ये जनजागृती होऊन वन्य प्राण्यांबद्दल आस्था निर्माण व्हावी म्हणून गडचिरोलीच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये एकूण ९६ मुले व ६० मुलींनी सहभाग नोंदविला. मुलांमध्ये ५ किमी मध्ये प्रथम नागेश्वर संजय रस्से, द्वितीय अमोल रवींद्र पोरते, तृतीय सूरज साईनाथ बोटरे तर मुलींमध्ये ३ किमी मध्ये प्रथम पायल दिलीप मांदाळे, द्वितीय नवी दिलीप हजारे, व तृतीय पौर्णिमा आतला हे आले. प्रथम आलेल्या स्पर्धकाला ट्रॅक सूट, द्वितीय स्पर्धकाला स्पोर्ट शूज, व तृतीय आलेल्या स्पर्धकाला स्पोर्ट बॅग देण्यात आली. इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन उपवनसंरक्षक पवन जोंग व विभागीय वन अधिकारी सोनल भडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय वनाधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे, सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, सहायक वनसंरक्षक प्रतीक्षा काळे, निवृत्त विभागीय वनाधिकारी शंकर बिलोलीकर तसेच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी धीरज ढेंबरे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन वनपाल पेंदोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार वनरक्षक दुर्गम वार यांनी मानले. यावेळी वनपाल देगावे, वासेकर, गड्डमवार, नवघरे, जनबंधू, विद्या उईके, वनरक्षक खुळसंगे, तातावर, अलोने, कांबळे, वाढई, राठोड तसेच सामाजिक वन विभागाचे वनमजून आदी उपस्थित होते.