मूल शहरातील नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे द्या… — उलगुलान संघटनेचे तहसीलदारांना निवेदन…

प्रेम गावंडे

उपसंपादक 

दखल न्युज भारत

                मूल शहरातील नागरिकांच्या घरांना कायमस्वरूपी स्थायी पट्टे द्या अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीनं करण्यात आली असून तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. मूल शहरातील रेवणी लँड व रेल्वेच्या जागेवर मागील अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करत आहेत. मात्र अजूनही स्थायी पट्टे न मिळाल्याने त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नसून नागरिक संकटात सापडले आहेत.

              मूल शहरात अनेक वर्षांपासून नागरिक पक्के घरे बांधून राहत असून त्यांना अद्यापही स्थायी पट्टे मिळाले नाही. त्यामुळं नागरिकांना तात्काळ स्थायी पट्टे देण्यात यावे अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. स्थायी पट्टे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, डेविड खोब्रागडे, मनोज जाबूळे , सुरेश फुलझले, आशीष दुर्योधन, सुजीत खोब्रागडे आदि मुल शहरातील नागरिक निवेदन देतानी उपस्थित होते .