प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
३ आक्टोंबरला दिल्ली पुलीसच्या स्पेशल सेल ने आँनलाईन न्यूज पोर्टल “न्यूजक्लिक” संबधातील ४६ लेखक,संपादक,पत्रकार यांच्या घराची चौकशी केली होती.
आणि बेकायदेशीर हालचाली अधिनियमानुसार दोघांना अटक केली होती.त्यांचे मोबाईल फोन व कॅम्पूटर जप्त केलीत.
न्यूजक्लिक सोबत जुडलेल्या पत्रकारांच्या घरी छापेमारी नंतर बऱ्याच मिडीया संस्थानांनी भारताचे मुख्य न्यायाधीश यांना चिठ्ठी लिहीली आहे.
भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाई.चंद्रचूड यांना लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे की, मिडीयाला दाबण्यासाठी चुकीच्या मार्गाने होत असलेल्या सरकारी संस्थानांचा दुरुपयोग रोखावे याबाबत विनंती करण्यात आली आहे.
याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्याचा मुद्दा मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर चिठ्ठ्यांच्या माध्यमातून ठेवला आहे आणि मिडीयावर हमला फक्त त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करीत नाही तर देशाच्या लोकशाही मजबूतीला प्रभावित करतो आहे हे सुद्धा मिडीया संस्थानांचे म्हणणे आहे.