वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम :- अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत दि. 2 ऑक्टोंबर ते 4 ऑक्टोंबर पर्यंत नागरी समाज व स्थानिक नेतृत्व प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात आले. त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही योगासनाने झाली.सकाळी अर्धा तास हा योगासनाचा आयोजनाप्रमाणे कार्यक्रम पार पडला.त्यानंतर मतदान जनजागृती रेलीचे आयोजन करण्यात आले.दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नारे देण्यात आले. नात्यांच्या माध्यमातून सर्व गावकयांना योग्य ते संदेश देण्यात आले.त्यानंतर सर्व जण एकत्र जमले व कमीतकमी 8:30 पर्यत वेळात आजच्या सेशन साठी फ्रेश होउन येण्याचे ठरवले.

नियोजीत वेळेत सर्व जण ठरविलेल्या ठिकाणी एकत्र जमले.आजच्या सेशन चे मार्गदर्शक मा.दिवाकर देशमुख आल्यानंतर आजच्या या सेशनला सुरुवात करण्यात झाली.कार्यक्रमाची सुरुवात ही समाज प्रबोधनवर गीत गाऊन करण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.”ग्रामसभा ” हा आजचा कार्यक्रमाचा विषय मांडत त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी सर्वांना ग्रामपंचायत अधिनियम 1958′ या पुस्तकाची ओळख करून दिली.

त्यानंतर त्यांनी सर्वासमोर काही प्रश्न मांडले.त्यातील पहिला प्रश्न असा कि- नागरी समज कशासाठी? त्यानंतर सर्वाची मते जाणून चर्चा करून काही निष्कर्ष निघाले असे कि, ‘समाजातील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतीक व शैक्षणीक स्थीतीत बदल करण्यासाठी नंतर त्यांनी दुसरा प्रश्न सर्वासमोर मांडला तो असा कि तुम्हाला समाजामधील कोणत्या घटनेचा राग येतो? त्यावर प्रशिक्षणार्थीनी आप आपले मत व्यक्त केले.त्यानंतर दिवाकर देशमुख यांनी गाव ही संकल्पना धरून एक गावाची संकल्पना स्पष्ट केली.गावामधील विविध प्रश्न त्यांनी मांडले व त्यासाठी असलेल्या उपाययोजनांवर सविस्तरपणे चर्चा सुद्धा केली.त्या सर्वामध्ये कशाप्रकारे बदल घडवायचा हे प्रशिक्षणार्थीना सांगितले.आणि या सर्वासाठी ग्रामसभा घेणे हे खुप महत्त्वाचे आहे.असे आम्हाला पटवुन दिले.यामध्ये त्यांनी ग्रामसभा अधिनियम 1958 कलम 243 अ शासन प्रशासन श्रीस्तरिय व्यवस्था ( जिल्हा परिषद, पंचायत अध्यक्ष-सभापती, सरपंच) हे सांगितले.ग्रामपंचायत, संसद,विधानभवन, लोकसभा,विधानसभा याबदल सुद्धा समजावुन सांगितले.त्यांनी ग्रामपंचायत → ग्रामसभा मासिक सभा, याबद्दलही सांगितले. त्या मध्ये समन्वय ग्रामसभा ,अंदाजपत्रक, ग्रामसभा,नियोजन ग्रामसभा, विशेष ग्रामसभा,मासिक सभा याबद्दलही सांगतांना त्यांनी त्या सभेला कोणाची कोणाची उपस्थीती असावी हे स्पष्ट केले.व आपले प्रश्न ग्रामसभेत कोण मांडु शकतो तसेच तीथे कोणाला बोलण्याचा अधिकार असतो व कोणाला नसतो हे ही चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले.त्यासोबतच त्यांनी सांगितले कि गावातील प्रशासकिय लोकांच मुल्यमापन ही करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.हे एक अधिकार सर्वाना समजावले.त्यामध्ये आशा वर्कस, ग्रामसेवक,शिक्षक, वनविकास अधिकारी, कोतवाल, पशुसंवर्धन,पोस्टमन यांची व यांच्या सारख्या सर्वच प्रशासकिय अधिकाचांची कार्य व जबाबदारी ही काय असते ते सर्व. ती मंडळी पार पाडते कि नाही यावर आपण लक्ष द्यायला हवे व त्यांच्याकडुन ती सर्व कामे आपण करून घ्यायला हवी हे त्यांनी सांगितले.त्यानंतर जेवणाची ब्रेक झाल्यामुळे सर्वाना १ तासाचा ब्रेक देण्यात आला.ब्रेक संपल्यानंतर ठराविक वेळेत ठरावीक ठिकाणी सर्व पोहोचने व सेशन ला पुन्हा सुरुवात झाली.यामध्ये त्यांनी गावाला मिळणारा निधी म्हणजेच गावाची आर्थिक स्त्रीत कोणते ? यावर माहीती दिली. उदा. नैसर्गिक संसाधने, कर, पारितोषिक, शासकिय योजना इत्यादी बदल सांगितले.याच बरोबर समारोपय सत्र घेण्यात आला.त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.सुरेश लुले यांनी युवा आणि अनुभव शिक्षा केंद्र यामधला फरक स्पष्ट करून दिला.समोरील नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली.आणि प्रशिक्षणार्थी यांच्या तीन दिवशीय निवासी शिबिरा बाबत आपले मनोगत व्यक्त केले.अशा प्रकारे हे नागरी समाज व स्थानिक नेतृत्व प्रशिक्षण संपन्न झाले…

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com