“प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन थाटात संपन्न”…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

        आज दिनांक 5/9/2024 ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे शासकीय परिपत्रकानुसार श्री.चक्रधर स्वामी अवतरण दिन थाटात संपन्न झाला.

           अध्यक्ष स्थानी डॉ. वैशाली हिंगे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान होत्या. त्यांनी आपल्या भाषणात श्री.चक्रधर स्वामी यांच्या जीवन चारित्रावर प्रकाश टाकला. मुख्य प्रमुख पाहुणे डॉ. एकांक्षा कानफाडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान होत्या.

           कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि संचालन श्री हंसराज ढोके आरोग्य सहाय्यक यांनी केले. त्यामध्ये त्यांनी सालबर्डी येथील स्वामीची लिळा आणि त्याचे तात्पर्य प्रतिपादन केले. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ हा लीळाचारित्र आहे आणि आद्य कविता महदंबेचे ढवळे प्रसिद्ध आहे.

            त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन श्री.सज्जनदास थूल आरोग्य सहाय्यक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील श्री अथर्व बंड, श्री तिरूपती यतम, श्रीमती संगीता काळबांडे, कांचन हटवार, शारदा जामणिक, माया कंभाले, नलिनी शिंगणे फराहणा सय्यद श्री प्रल्हाद कुमरे श्रीमती टेकाम यांनी परिश्रम घेतले.