रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर : – चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन चिमूर येथे दिनांक 4 सप्टेबरला चिमूर येथील नेहरु विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी , सतीश वारजूकर विधानसभा समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, गजानन बुटके सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर, संदीप कावरे माजी अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस चिमूर, राजू लोणारे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी, प्रदीप तळवेकर अध्यक्ष ओबीसी काँग्रेस चिमूर तथा पर्यावरण विभाग, गौतम पाटील महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी युवक, नागेंद्र चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस तालुका, विलास मोहिनकर तालुका सरचिटणीस काँग्रेस कमिटी,साईश वारजूकर सरपंच शंकरपूर, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान कु.शिवानी वडेट्टीवार म्हटले की चिमूर क्षेत्रात पदवीधर व पदव्यूत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने युवकांना बाहेर शहरात शिक्षणासाठी जावे लागते जेव्हा आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आल्यास आम्ही शिक्षणाची आरोग्याची सोय करू आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तर मंचावरून धनराज मुंगले यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकास हा 10 वर्षे मागे गेला असून चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग 7 वर्षापासून अर्पूणच आहे. यामध्ये चिमूर क्षेत्रातील नागरीकाचे जिव गेले आहे याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतिक समिती चिमूर द्वारा आयोजित केलेल्या या भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धकांना शुभेच्छा देत आलेल्या विदर्भातील 13 गोविंदा ग्रुपचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविले.
या स्पर्धकांमध्ये पहिले बक्षीस जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांना मिळाले तर दुसरे बक्षीस आदिशक्ती ग्रुप भंडारा आणि तिसरे बक्षीस शिवशाही गर्ल्स ग्रुप राजुरा यांना मिळाले. बक्षीसमद्धे प्रथम पारितोषिक 1 लाख 1 रुपये श्रीमती कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार तर दुसरे पारितोषिक 51 हजार 1 रुपये कु.शिवानीताई विजय वडेट्टीवार महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि तिसरे पारितोषिक 21 हजार 1 रुपये धनराज मुंगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक यांच्या कडून देण्यात आले.
यावेळी शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी , सतीश वारजूकर विधानसभा समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, गजानन बुटके सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर, संदीप कावरे माजी अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस चिमूर, राजू लोणारे सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी, प्रदीप तळवेकर अध्यक्ष ओबीसी काँग्रेस चिमूर तथा पर्यावरण विभाग, गौतम पाटील महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी युवक, नागेंद्र चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस तालुका, विलास मोहिनकर तालुका सरचिटणीस काँग्रेस कमिटी,साईश वारजूकर सरपंच शंकरपूर, नितीन कटारे माजी नगर सेवक, पलाश वारजूकर ,शंकर माहुरे, राजू नन्नावरे, राजू दांडेकर, डॉ. किन्नाके माजी वैधकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर ,ताहीर शेख,अक्षय नागरीकर, इशांत मामीडवार शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, रोहन नन्नावरे महासचिव जिल्हा युवक काँग्रेस, सारंग मामिडवार, प्रविण वरगटीवार अमित सातपुते, सुभाष मोहिनकर तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
दहीहंडीचा कार्यक्रम बघण्याकरीता चिमूर शहरातील व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.