युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- देशप्रेम व राष्ट्रप्रती राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे काम समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांचे परम कर्तव्य असते.या राष्ट्राचा पोशिंदा म्हणजेच किसान आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेला जवान हे दोन घटक मात्र निस्वार्थापणे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात धन्यता मानत असतात असे प्रतिपादन बडनेरा येथील भारतीय सैन्यदलातील श्रीकांत शेगोकार यांनी बोलताना व्यक्त केले ग्रामस्थांच्या वतीने आयोजित निवृत्त जवान बाळकृष्ण वानखडे यांच्या नागरी सत्कार तथा कृतज्ञता सोहळ्यात केले.
आपल्याच खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्त सन्मान होणे खूपच कमी लोकांच्या नशिबी असते. हा गौरव म्हणजे त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची पावतीच असते. सरक्षणदलात सेवेची संधी मिळणे बहुसंख्य ग्रामीण युवकांचे स्वप्न असते.महाराष्ट्र त्यात अग्रेसर असून दर्यापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावातून किमान 5 युवकांनी तरी संरक्षण दलात दाखल होऊन मायभूमीची सेवा केली पाहिजे. राष्ट्रीय उभारणीत सर्वात महत्वाचा वाटा असनाऱ्या किसान अर्थात बळीराजाही धरणीला आईची उपमा देऊन निस्वार्थापाने कर्म करत असते म्हणून समजणे त्यांच्याबद्दलही कृतज्ञतेची भावना जोपासली पाहिजे असे बाळकृष्ण वानखडे यांनी नमूद केले.
देशाच्या सेवेसाठी अविरत झटणारे आपल्या देशातील भारतीय जवान अविरत सेवा देत असतात. अशाच प्रकारची सेवा देऊन स्वगृही सुखरूप परत आले आहे म्हणून नांदरून गावचे सुपुत्र बाळकृष्ण प्रल्हादराव वानखडे बी एस फ यांनी बी एस एफ भारतीय सेनेमध्ये 32 वर्ष देशसेवा देऊन मायदेशी सुखरूप परत आले त्यानिमित्ताने नांदरून येथील समस्त ग्रामवाशी तर्फे नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
बाळकृष्ण वानखडे यांनी भारतीय सेनेमध्ये 32 वर्षे सेवा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी केली असून आज रोजी त्यांचे दर्यापूर नगरीमध्ये आगमन झाले असता दर्यापूर बस स्थानक चौकात बाळकृष्ण वानखडे रा नांदरून यांनी 32 वर्ष भारत मातेचे हे निष्ठापूर्वक आणि अखंड देशा सेवा करून दिनांक 4 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविकास आघाडीने त्यांना भेट देऊन त्यांच्या स्वागत व अभिनंदन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवक अंकुश वाकपांजर यांनी सुद्धा शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच दर्यापूर येथुन येऊन त्यांच्या मूळ गावी नांदरुन येथे गावकऱ्यांच्या वतीने व माजीसैनिक यांच्या वतीने त्यांची जंगी मिरवणूक काढून यशस्वीरीत्या सेवापुर्ती सत्कार सोहळा थाटात पार पडला.