सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधि वर्धा
हिंगणघाट : विदर्भ विमुक्त भटके ,आदिवासी सयोजन समिति महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे निमित्ताने हिंगणघाट येथिल नांदगांव (बोरगांव)आदिवासी कोरकू-गोंड वस्तीत जनजागृति बैठक घेण्यात आली.
सभेचे नियोजन मंगलाताई लोखंडे अध्यक्ष , गंगाई बहुउद्देशीय संघटना यानी केले. सदर बैठकी मध्ये विमुक्त भटके आदिवासी, सायोजन समितिची भूमिका आणि महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे बाबत साक्षरता संस्थाचे विजय पाचारे यानी मांडले.
आदिवासी कोरकू समूहाच्या समस्याचे निवेदन गाठोड्यांच्या सवरूपात तयार करण्यात आले असुन ते गाठोड़े महाराष्ट्र राज्याच्या सरकारला व मंत्रालयात पाठवायचे आहे.
१ ) आदिवासी कोरकू -गोंड समुहाला हक्काचे घर पट्टे मिळावे.
२)जातीचे दाखले,जन्म नोंदी व इतर दाखले मिळण्यासाठी शासनाने मदत करावी.
३) रोजगारासाठी वारंवार होणारे स्थलांतर थांबवावे.
अशा मागण्या स्वरूपी समस्याची गाठोडे हे येत्या १५ सप्टेंबर २०२४ ला जिल्हाअधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदनाद्वारे पोहोचविले जाणार आहे.
महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रे मध्ये वर्धा जिल्ह्यातील आदिवासी व विमुक्त भटके समूह आणि इतर व्यक्ति संस्था व संघटना ज्या आदिवासी भटक्या समुहासाठी काम करत आहे. अशा सर्वच व्यक्ति जास्तीत जास्त संखेने सहभागी होण्यासाठी जनजागृति चर्चा सत्र व नियोजन बैठक करत आहे.
सरकारने आमच्या हक्काची जाणिव ठेवावी.आमच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साधनाची व्यवस्था करावी. महिलानी पुढ़िल यात्रा यशस्वी होण्यासाठी कंबर कसलेली आहे. कोरो इंडिया ,मुंबई द्वारा संचालित ग्रासरूट नेतृत्व आकाश दुर्गे यानी सदर बैठकी साठी घेतले.यावेळी सर्व उपस्थितांचे आभार मानून यात्रेचे पुढिल नियोजन करण्यासाठी पुढ़ाकार घेतला.