दखणे विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व बालिका सुरक्षा दिन साजरा.

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

मुरूमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिनानिमित्त माजी विद्यार्थी सत्कार व बालिका सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

          याप्रसंगी मुख्याध्यापक महेंद्र जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक भास्कर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी मिंटू अभिमन्यू दत्त यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली.

          यावेळी माजी विद्यार्थी महेश शिवप्रसाद सोनी, तामेश्वर चमनलाल विश्वकर्मा, शशी ताई जाळे आदी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

          याप्रसंगी प्रमुख अतिथी सतीश सुरनकर यांनी माजी विद्यार्थी सत्कार आणि बालिका सुरक्षा दिन साजरा करणे मागचा हेतू , विषद केला.

          सत्कारमूर्ती माजी विद्यार्थी मिंटू दत्त, महेश सोनी, तामेश्वर विश्वकर्मा, शशी ताई जाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेऊन, करिअर ची निवड करावी व यशस्वी व्हावे असे मार्गदर्शन केले.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर मेश्राम यांनी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घे वून यशस्वी नागरिक घडले, त्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे प्रतिपादन केले.

          शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला यावेळी मुख्याध्यापक म्हणून अयान पठाण यांनी कामकाज सांभाळले तर शिक्षक म्हणून क्रिश लाडे, नदीम शेख, कुमारी रूपाली नरोटे, शगुन संगोडिया,माही बैरवार ,जोया खान,संस्कृती कुंजाम, श्रद्धा दखणे आदींनी कर्तव्य बजावले.

             कार्यक्रमाचे संचालन घनश्याम चिंचोलकर यांनी केले तर आभार बाळकृष्ण बोरकर यांनी मानले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विलास चौधरी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.