शाळेमध्ये मुलींसाठी सोयीसुविधा न पुरवल्यास शाळेला ताला ठोकू… — युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांचा इशारा…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

 शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून दर्यापूर तालुक्यातील शाळेमध्ये सोयीसुविधा न पुरवल्यास शाळेला ताला ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला.

         संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सध्या शाळेमध्ये मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार होत आहे. या सर्व बाबींचा निषेध सर्व स्तरातून होत असून शाळा संहितामध्ये शाळा मान्यता वेळी सुरक्षितेच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजना उदाहरणार्थ शौचालय, बाथरूम व सध्याच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सोयी सुविधा मुळे शाळांना मान्यता मिळते याचा अर्थ शाळेमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असा होतो.

         अशा घटना दर्यापूर मध्ये होऊ नये याची काळजी घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी दर्यापूर यांचे कार्यालय गाठून त्यांना शाळा प्रमुखांची मीटिंग घेऊन तात्काळ वरील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश करावा असे सांगितले.

            या सोयी सुविधा उपलब्ध न केल्यास शाळांना 7 दिवसानंतर आम्ही ताला ठोकू व होणाऱ्या नुकसानास गटविकास अधिकारी व पंचायत समिती दर्यापूर यांचे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला.

            यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.अलका निलेश पारडे, शिवसेना दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रतिक राऊत, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर वडतकर, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिऱ्हे,महिला आघाडी तालुकाप्रमुख गीताताई अढाऊ ,शिव सहकार सेना माजी तालुकाप्रमुख विजय अढाउ ,युवासेना शहर प्रमुख रोहित बायस्कर, युवासेना तालुका समन्वयक भरत हिंगणीकर, युवासेना तालुका सरचिटणीस धनंजय पवार, शिवसेना दर्यापूर उपशहर प्रमुख निलेश पारडे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख शालिनीताई विलास गिऱ्हे, शारदाताई बंडू गावंडे, विनाताई कडू, लताताई गवळी, अर्चनाताई नंदू,पखाले, महिला आघाडी शहर प्रमुख सुनंदाताई सावरकर, शरद आठवले, संदीप धर्माळे, आशिष लायडे, विलास गिरे, शुभम विल्हेकर आकाश जवुळकार, रवींद्र सोळंके, ऋत्विक मानकर, नदीम शहा, धनंजय धनोकार, मंगेश बोरकर,भारत सावरकर तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.