कूरखेडा ते गांधीनगर,वडेगांव मार्गावर असलेल्या रपट्याचे बांधकाम करा – माजी सभापती गिरीधर तितराम… 

      राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       कूरखेडा ते गांधीनगर व पूढे वडेगांव मार्गावर असलेल्या नाल्यावर नविन पूलाचे बांधकाम सूरू आहे, त्यामूळे पूलाचा बाजूने कच्चा मार्गावरून सूरू असलेली वाहतूक पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने बंद होती. सद्या पाण्याचा रोष कमी झालेला आहे.

         मात्र पावसाच्या पाण्याने येथे खड्डे पडल्याने येथून वाहन काढणे कठीन ठरत आहे. त्यामूळे संबंधित कंत्राटदाराने येथील खड्डे बूजवत व मूरूम गिट्टी टाकत रस्ता(रपटा) दूरूस्त करावा अशी मागणी माजी प.स. सभापती गिरीधर तितराम यानी केली आहे.

          सार्वजनिक बांधकाम उपविभाग कूरखेडा अंतर्गत संबंधित कंत्राटदाराकडून सदर बांधकाम अतिशय संत गतीने सूरू असल्याने गांधीनगर,आंजनटोला,वडेगाव तसेच गोंदिया जिल्हातील कन्हाळगांव तूकूम येथील नागरीकांना अडचण झालेली आहे. मागील चार महिण्यापासून हा मार्ग रहदारी करीता बंद आहे त्यामूळे लांबचा मार्गाने नागरीकाना प्रवास करावा लागत आहे.

           बांधकाम सूरू असलेल्या पूलाचा बाजूने काढण्यात आलेल्या मार्गाचा मजबूतीकरणाचे कोणतेच काम संबंधित कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात न आल्याने नागरीकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सूरू असलेल्या पूलाच्या बांधकामाला अजून अवधी असल्याने पूलाजवळून काढण्यात आलेल्या कच्चा मार्गाची(रपट्या) तात्काळ दूरूस्ती व मजबूतीकरण करण्यात यावे. अन्यथा बांधकाम विभागा विरोधात ग्रामस्थासह आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा माजी पं. स. सभापती गिरीधर तितराम यानी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिला आहे.