राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
सार्वजनिक हनूमान मंदीर कूरखेडा येथे तान्हा पोळा निमीत्य भव्य वेशभूषा व नंदीसजावट स्पर्धेचे मंगळवार रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत “अ” गटात विठ्ठल रूक्मिणी चा वेशभूषेत नंदीसह सहभागी येथील आयुष गिरडकर याला प्रथम क्रमांकाचा पूरस्कार मिळाला तर “ब” गटात मनन नाकतोडे हा विजेता ठरला.
शहरात मागील सलग ३८ वर्षापासून काळे कूटूंबाचा वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. त्या निमित्ताने यंदाही सार्वजनिक हनूमान मंदीराच्या प्रांगणात तान्हा पोळा निमीत्य भव्य वेशभूषा व नंदीसजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
येथे सहभागी स्पर्धक बालकाना शिवसेना उबाठा गटाचे तालूका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे यांचा वतीने पूरस्कृत करण्यात आले. मंगळवार रोजी सर्वप्रथम राणाप्रताप वार्डातील काळे यांचा घरापासून वाजत गाजत मानाचा नंदी बैलाची मिरवणूक काढण्यात येत हनुमान मंदिरात पोहचली. येथे आयोजित स्पर्धेत संत गोरोबा कूंभार यांचा वेशभूषेतील नंदी सह सहभागी बालक,शेतकऱ्याच्या वेशभूषेत त्यांची परीस्थीती दाखवणारा बालक, विठ्ठल रूक्मिणी चा वेशभूषेत नंदीसह सहभागी बालक, कन्हैया चा वेशभूषेत सहभागी बालक आकर्षणाचा केंद्र बिंदू होते.
यावेळी “अ” गटात प्रथम आयुष गिरडकर,द्वितीय नाया लांजेवार, तृतीय वंश बागडे तर प्रोत्साहन पर पूरस्काराचे मानकरी सोहम रासेकर व चैतण्या देशमुख ठरले तसेच “ब” गटात प्रथम मनन नाकतोडे द्वितीय मनिता बोकडे तृतीय गावित ऊईके तर प्रोत्साहन पर पूरस्काराचे मानकरी क्रिश शिवणकर व एंजल घोडेस्वार ठरले या शिवाय स्पर्धेत सहभागी २२५ स्पर्धकामधून ईश्वर चिठ्ठी द्वारे निवड करीत काही स्पर्धकाना विविध पूरस्कार आयोजक आशिष काळे, वैशालीताई काळे,मंजिरी मोहरील,शितल काळे,राघव काळे यांचे हस्ते प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.
इतर सहभागी बालगोपालांना बोजारा व बिस्कीट चे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील,रिना पाटील, नगरसेवीका प्राची धोंडणे, सेवानिवृत्त मूख्याध्यापक चैतराम दखने,प्राध्यापीका शेंडे, शिक्षक सूरजागडे, पत्रकार शाम लांजेवार व जूआरे मॅडम यांनी केले.
या प्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी, माजी जि प सदस्य अशोक इंदूरकर, कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, मूजफ्फर अ.बारी, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, सभापति अशोक कंगाले, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,अल्का गिरडकर,जयश्री रासेकर नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख ,प्रतिष्ठित व्यवसायीक दामू उईके,शारदा गाथाडे तसेच मोठ्या संख्येत शहरातील नागरिक व महिला मंडळी हजर होते कार्यक्रमाचे संचालन गजानन भोयर यानी केले.