राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे आयोजन…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

        चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचारित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 सप्टेंबर 2024 ला शारीरिक शिक्षण विभागाद्वारे ‘शिक्षकाचा अभ्यासक्रम व शारीरिक शिक्षकांची भुमिका’या विषयावर एक दिवशीय विद्यापिठस्तरीय कार्यशाळचे आयोजन केले आहे.

          कार्यशाळेचे उद्घाटक डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले आहेत. बीजभाषक डॉ.धनंजय वेळूकर, सदस्य, क्रिडा मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे करणार आहेत.

             प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा विनायकराव कापसे, सचिव, गांधी सेवा शिक्षण समिती प्रा मारोतराव भोयर, कोषाध्यक्ष उपस्थित राहतील.

           राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शारीरिक शिक्षकांचा अभ्यासक्रम व अंमलबजावणी या विषयावर प्रथम सत्र आयोजीत केले आहे.

           या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ.मनोज अरमारकर, सदस्य क्रीडा मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ.अनिस खान सदस्य क्रीडा मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शन करतील.

          दुसऱ्या सत्रात व2020 राष्ट्रीय शैक्षणिक अनुषंगाने शारीरिक शिक्षकांची भूमिका या विषयावर चर्चा होईल अध्यक्ष म्हणून डॉ.महेशचंद्र शर्मा सदस्य क्रीडा मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर डॉं महेश जोशी मार्गदर्शन करतील.

         कार्यक्रमाचा समारोप दुपारी होईल प्रसंगी मान्यवरांचा सत्कार, सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्रांचे वाटप केल्या जाईल. या विद्यापीठ स्तरीय एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अनिता लोखंडे, संचालक क्रिडा व शारिरिक शिक्षण विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल, डॉ. उदय मेंढूलकर यांनी केले आहे.