भारतीय नागरिकांनो विचार करा… वेळीच जागृत व्हा…

पुढील पोस्ट वाचून, समजून घेऊन, निदान आपल्या नातवासाठी, मुलाबाळासाठी तरी, कृतीतून सिद्ध व्हा…

मेरा भारत महान…

    परंतू…

आमच्या झोपेमुळे आणि भ्रष्टाचाराच्या कँसरमुळेच….

मेरा भारत गहाण..

          ” भारतीय स्वातंत्र्याच्या साधारण 15 /20 वर्षानंतर स्वातंत्र्यापूर्वीच्या गुलामीच्या स्वभावातून भारत मातेच्या पोटात……

        ‘ भ्रष्टाचार ‘

नावाचा गर्भ धारण झाला….!

हळूहळू हा गर्भ एवढा मोठा होत गेला की, गेल्या 60 वर्षानंतर उदरातून बाहेर येण्याच्या आतच किंवा बाळंतपणातच मातेचा जीव घेतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे…..!

           कारण…..

       आमची भोळी भाबडी जनता पटकन गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर, व्यक्तीसमूहावार, व्यवस्थेवर, राजकारण्यावर, राजकीय पक्षांवर ( कूटनितीच्या आधारे विश्वासघात करणाऱ्या), नितिभ्रष्ट सनदी अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर, एवढेच काय तर न्यायालयावर सुद्धा अमर्याद विश्वास ठेऊन जगणारी आणि जगत आलेली हीच भोळी भाबडी जनता कधी काळी मेरा भारत महान म्हणणारी आता मेरा भारत गहाण म्हणण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे…….!

          एक तर महाराष्ट्र राज्य सरकार आणि देशातील इतर राज्य सरकारे केवळ भ्रष्टाचारामुळे तुटीचे अर्थसंकल्प सादर करून आर्थिक दिवाळखोरीचे उंबरठे ओलांडण्याच्या तयारीत तर आहेतच…..

            शिवाय केंद्रसरकार सुद्धा विशेषतः गेल्या 2014 पासून केवळ भ्रष्टाचारामुळेच नव्हे तर ‘नीतीभ्रष्टाचारामुळे ‘तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थब्यवस्थाच कधी कोलमडून पडेल याची शाश्वती राहिलेली नाही.

            यामध्ये पुन्हा एक भर टाकलेली आहे ती म्हणजे शेअरमार्केट मधील आर्थिक घोटाळ्याने महागाई आणि बेरोजगाराच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. आजपर्यंत आपण बघितले की शेतकरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणारे, आता मात्र शेअर मार्केटच्या नितिभ्रष्ट घोटाळ्यामुळे कोट्यावधी जनता आत्महत्या करताना यापुढे दिसणार आहे………….!

         कारण या देशातील शेअरमार्केट ची उलाढाल थोडक्यात सांगावयाची म्हणजे केंद्रसरकारचे वार्षीक उत्पन्न जेवढे असेल त्याच्या तीनपट या शेअरमार्केटची उलाढाल आहे….!

      आणि आपण जाणतोच की देश किंवा राज्येच काय तर सर्व जग केवळ आणि केवळ आर्थिक उलाढालीवरच चालत आहे. हे सिद्धच उदाहरणाने करावयाचे असेल तर पहिल्या लॉकडाऊनमध्ये अडीच महिने आर्थिक उलाढालीची चाके जेंव्हा थांबली होती, तेंव्हा याच मोदी सरकारने RBI चे जबरदस्तीने पाऊणे दोन लाख कोटी रुपये काढून घेतले होते. म्हणजेच आर्थिक उलाढालीवरच आपले कुटुंब, आपल्यापतसंस्था, बँका, आपली राज्यसरकारे, आपले केंद्रसरकार चालत लेले आहे, चालत आहे, हे सिद्ध झाले.

           आता ही आर्थिक उलाढाल आपल्या देशात सर्वात जास्त या शेअर मार्केट मध्ये चालते हेही सिद्ध झाले आहे. आता आपण या हिंडेन बर्ग च्या रिपोर्टने केलेल्या खळबळीकडे लक्ष वेधू . गौतम अदानी ग्रुपने कशाप्रकारे आपल्या शेअरची किंमत कृत्रिम आर्थिक अफवेच्या फुगवट्यानुसार वाढवली आणि शेअर मार्केटमध्ये आर्थिक घोटाळे करून गेल्यावर्षी जगात 7 व्या क्रमांकाच्या श्रीमंतांच्या रांगेत मानाचे स्थान मिळविले……!

         परंतू , हिंडेन बर्ग संस्थेने ( ही एक आंतरराष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे जी अशा प्रकारच्या अफ़वाच्या फुग्यातील हवा काढते ) आपल्या गोपनीय रिपोर्टने याची हवा काढली. तेंव्हा देशात मोठी खळबळ माजली. म्हणून देशातील गोदीमीडिया व्यतिरिक्त यू ट्युब मीडियानी या संदर्भात सखोल जाऊन सत्य जाणले तेंव्हा हे समजले की, मोदी – शहा यांनी माधवी बूच पुरी या ICICI बँकेच्या कधीकाळी चेअरपर्सन असणाऱ्या आणि शेअरमार्केटमध्ये खिलाडू असणाऱ्या या महिलेला शेअरमार्केटचे कन्ट्रोल करणाऱ्या सेबीच्या चेअरमनपदी बसविले. जीची गौतम अदानी ग्रुपमध्ये भागीदारी होती. गेल्या 2017 पासून जेंव्हा ही महिला या मुख्य पदावर येऊन बसली तेंव्हा पासूनच अदानी ग्रुपची शेअर मार्केट व्ह्याल्यू गगनाला भिडली. यातून गौतम अदानी जगात 7व्या क्रमांकावर पोहोचले. म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार झाला. कारण ज्यांच्या ( माधवी पुरी बूच ) हातात सर्व सूत्रे तीला तर ICICI बँकेच्या निवृत्तीनंतर पगाराच्या दुप्पट निवृत्तीवेतन आजही चालू आहे….!

             शिवाय भारतीय शेअर मार्केटला 100% कंट्रोल करणारे पद सुद्धा याच महिलेच्या हातात आहे. शिवाय ZEE TV चे मालक सुभाष N चंद्रा यांनी एका दलालामार्फत याच माधवी बूच पुरी यांनी 100 कोटी रुपयाची लाच गेल्या फेब्रुवारीत मागितली होती की त्यांच्यावर असलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या कर्जातुन बाहेर काढण्यासाठी. ही बाब स्वतः त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की, 2014 पासून आजपर्यंत गौतम अदानी, अंबानी आणि अशा ग्रुपवर विरोधी पक्ष किंवा विशेषतः राहुल गांधी जे संसदेत मोदींना प्रश्न विचारतात तेंव्हा पोपटासारखे बोलणारे मोदी मौन धारण करतात……..!

              याचा अर्थ स्पष्ट आहे की, माधवी बूच पुरीना पुढे करून अशा अदानी, अंबानी ग्रुपच्या माध्यमातून शेअरमार्केटवर कब्जा करणे ( ज्याचे उत्पन्न आणि उलाढाल केंद्रासरकारपेक्षा तीनपट आहे ) त्यातील भ्रष्टाचारातील उत्पन्न RBI च्या ऐवजी RSS च्या RBI मध्ये टाकून त्याचा वापर आमदार खासदार विकत घेऊन, फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती वापरून तुम्हाआम्हाला ( भारतीय जनतेला ) लोकशाहिच्या नावावर हुकूमशाही निर्माण करून गुलाम बनविणे. हेच धोरण मोदी – शहाने अवलंबल्यामुळे आमचा देश कोरोनाच्या गतीने स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जात आहे. वेळीच आपण सावध होणे आवश्यक आहे. आणि या संविधानविरोधी शक्तीला संविधानवाद्यानी आक्रमक होणे आवश्यक आहे…….!

   अन्यथा….

        जागृतीचा लेखक

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689