दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमूर तालुक्यातील मौजा सोनेगाव (बेगडे) येथील युवकांनी गळफास लावून राहते घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सदर युवकाचे नाव अमोल गजानन श्रिरामे असे असून त्याचे वय २५ वर्ष आहे.
आज दुपारनंतर ४ वाजताची सदर घटना आहे.त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
चिमूर पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.मृत्यूचे कारण अजून पर्यंत पुढे आले नाही.