आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान..

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

नागपूर – शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर तर्फे शिक्षक दिनानिमित्त नागपूर प्रकल्पातील आदिवासी डोंगराळ भागात काम करणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून आश्रमशाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवून शाळेचे नावलौकिक करण्याचे अद्वितीय कार्य शिक्षकांच्या कार्य कुशलतेने घडत आहे.‌

        निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गती आणण्याचे काम शिक्षकांच्या हातून स्वयंप्रेरणेने घडत आहे. द-याखोऱ्यात काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने नागपूर प्रकल्पाअंतर्गत येत असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर येथे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशासन श्री.सरीयाम,श्री. गजापुरे कार्यालय अधीक्षक, श्री.संदीप शेंडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, श्रीमती ठाकरे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, विषय मित्र श्री. फुंडे व श्रीमती ढोके तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे हस्ते महेंद्र तिरपुडे,माध्यमिक शिक्षक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा नवेगाव चिचदा, श्रीमती वासनिक माध्यमिक शिक्षिका अनुदानित आदिवासी आश्रम शाळा दाहोदा उच्च माध्यमिक स्तरातील शिल्पा खुळे उच्च माध्यमिक शिक्षिका शासकीय उ.माध्यमिक आश्रमशाळा कवडस, श्री गुरबांधे, उच्च माध्यमिक शिक्षक आदर्श संस्कार अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मांढळ, आश्रमशाळेचे मुख्याध्यापकांत विजया खापर्डे, मुख्याध्यापिका शासकीय उ.माध्यमिक आश्रम शाळा कवडस या इत्यादी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह स्वरूपात गोंडी पेंटिंग देऊन गौरवान्वित करण्यात आले.

          याप्रसंगी सर्व सत्कारमूर्ती शिक्षकांनी आपापले शैक्षणिक अध्ययन अध्यापनातील मनोगत व्यक्त केले. सदर पुरस्कारामुळे आमच्यात नवचेतना निर्माण होऊन अधिक गतीने काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे, असे विचार पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी व्यक्त केले.