समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो : शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण.. — शिवसेनेच्या वतीने आळंदीत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो, खरा गुरू आपल्या शिष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचे योगदान देतो, त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शिक्षकांनी केलेल्या या सर्व योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी केले.

           शिवसेना आळंदी शहर व श्री आळंदी धाम सेवा समिती यांच्या माध्यमातून आळंदीत शिक्षक दिन‌ साजरा करण्यात आला, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथील ज्ञानसाई इंग्लिश मिडीयम स्कुल मधील सर्व शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व नारळ देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला.

             यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.अंजली उपाध्ये, माजी सरपंच शिवाजी पगडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख योगेश पगडे, सचिन महाराज शिंदे, हिरामण तळेकर, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, अनिल जोगदंड तसेच ज्ञानसाई इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.