दखल न्युज भारत चिखलदरा
तालुका प्रतिनिधी
अबोदनगो चव्हाण
चिखलदरा मेळघाट अंतर्गत काजलडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद असून शाळेचे पाच ही शिक्षक शिक्षकदिनी गैरहजर असल्याने शाळा बंद असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज बंद आढळली.शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष विलासराव उईके व पालकांनी शाळेला भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक दिसले नाही.
येथे एक ते सात वर्ग असून शाळेत एकूण 152 विद्यार्थी आहेत.शाळा बंद असल्याबाबत चिखलदरा येथील गटशिक्षणाधिकारी माळवे सर यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले असल्याचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष यानी माहिती दिली व गटशिक्षणाधिकाऱ्यांबाबत खंत व्यक्त केली.
या केंद्रातील केंन्द्र प्रमुख अमोदे यांना अध्यक्ष यानी फोन केले असता त्यानी तात्पुरती व्यवस्था दोन शिक्षकांची केली होती.ते शिक्षक तेथे हजर पण झाले होते.पण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव उईके यांनी शाळेचा कुलुप उघडले नाही.
जो पर्यत आमचे पाच शिक्षक शाळेवर उपस्थित राहणार नाही तो पर्यंत शाळेचे कुलुप उघडणार नाही असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालकांनी म्हटले आहे.
आज सगळीकडे मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे आणी काजलडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद आहे.
शाळेच्या पाच शिक्षकांनी चिमुकल्या मुलांचा शिक्षक व शिक्षीका बनुन शाळेत जायचा आनंद हिरकावुन घेतला आहे.या पाचही शिक्षकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी अध्यक्ष व पालकांनी केली आहे.
जो पर्यंत पाचही शिक्षक शाळेवर उपस्थित राहत नाही तो पर्यंत शाळेचा कुलुप उघडणार नाही.
****
कोट
— मी केंद्र प्रमुख नामदेव अमोदे,मला काजलडोह जिल्हा परिषद उच्च पप्राथमिक शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष विलासराव उईके यांचा शिक्षक गैरहजर असल्याबाबत फोन आला.मी तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून दोन शिक्षकांची व्यवस्था केली होती.
पण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यानी शाळेचे कुलुप उघडु दिले नाही.जो पर्यत पाचही शिक्षक शाळेत येणार नाही तो पर्यत शाळेचा कुलुप उघडु देणार नाही असे शाळा व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष विलासराव उईके बोलले असल्याचे सांगितले.
नामदेव अमोदे
काटकुंभ केंद्र प्रमुख..
***
कोट
जो पर्यत शाळेत पाचही शिक्षक हजर होणार नाही तो पर्यंत शाळेचे कुलुप उघडणार नाही. तुमच्या तात्पुरत्या दोन शिक्षकांना परत घेऊन जा. आणि शिक्षकदिनी शाळेला दांडी मारणाऱ्या पाचही शिक्षकांवर उचित कारवाई करावी.
विलासराव उईके
शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष
काजलडोह