तालुक्यातील पांढरी गाव येथे प्रेम युगुलांची आत्महत्या.. — खळबळजनक घटना…

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

  पारशिवनी : पारशिवनी तालुक्यातील पांढरी गावात प्रेमी युगुलाने आज पहाटेच्या दरम्यान घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने खळबळ उडाली आहे.

      मिळलेल्या माहितीनुसार, पारशिवनी पोलीस ठाण्यांतर्गत पश्चिमेस 10 किमी अंतरावर असलेल्या सकराळा पांढरी गावातील रहिवासी गौरव वाघमारे (19) आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी वंदना (बदलेल नाव) (17) यांनी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

            दोरीच्या साहाय्याने गळ्याला फास लाऊन एकत्र आत्महत्या केल्याची माहिती मिळताच,हितेश बनसोड,हितज्योती फाऊंडेशनचे चेतन गिरकर आणि पारशिवनी पोलिसांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

         दोन्ही तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.आणि दोघांनी एकत्र आत्महत्या करण्याचे कारण काय,हे गुपित बनले आहे.पोलिसांच्या तपासानंतरच आत्महत्येचे कारण उघड होण्याची शक्यता आहे.

       सूत्रानुसार काही काळापूर्वी दोन्ही प्रेमी लग्न करणार असल्याची चर्चा होती.पुढील तपास पारशिवनी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राहुल सोनवने करित आहे.