पुण्यात कोथरूडमध्ये रंगणार वर्षा कवी संमेलन..  — पुरुषोत्तम महाराज हिंगणकर व डॉ.पंढरीनाथ शेळके यांना पुरस्कार जाहीर… 

 

   दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक पुणे विभाग

पुणे : शब्दवेधी बाणाक्षरी साहित्य समुह आयोजित वर्षा कवी संमेलन २०२३ हे कवी संमेलन पुण्यात कोथरूडमध्ये येत्या रविवारी दि.१० रोजी रंगणार आहे.

        या संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते होणार आहे,संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका मृणालिनी कानिटकर असणार आहेत,यावेळी संमेलनात शशिकांत पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे संमेलनाचे आयोजक रागिणी जोशी यांनी सांगितले.

        वर्षा कवी संमेलनात पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक कवी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

           तसेच यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे कार्याध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना संत नामदेव साहित्यरत्न पुरस्कार आणि डॉ.पंढरीनाथ शेळके यांना मानव सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे संमेलनाचे आयोजक रागिणी जोशी आणि पद्माकर वाघरुळकर यांनी सांगितले.