धनराज मुंगले व अरविंद रेवतकर भिसी वासीयांसाठी आधारस्तंभ..

 

  प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          धनराजभाऊ मुंगले यांचा राजकीय प्रवास भाजपा ते काॅंग्रेस असा आहे तर अरविंदभाऊ रेवतकरांचा राजकीय प्रवास काॅंग्रेस पक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे.

           मात्र या दोघांत जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची क्षमता,यशस्वी होण्याचे विशेष वेध,विपरीत परिस्थितीत अनुकूल मन ठेवण्याची त्यांची आगळीवेगळी कार्यपद्धत, नागरिकांना सांभाळून घेण्याची हातोटी व सांभाळून ठेवण्याचे सहृदयी जिव्हाळ्याचे कार्य, एकसमान दिसतात.

           धनराजभाऊ मुंगले आजच्या स्थितीत त्यांच्या कार्यबलावर अनेक क्षेत्रात यशस्वी ठरले असून,एकप्रकारे सामाजिक व राजकीय संघटन शक्ती त्यांच्यासाठी वरदान ठरू लागली असल्याचे चित्र पुढे आहे.

          आज ते ओबीसी सेलचे प्रदेश संघटक म्हणून महाराष्ट्र राज्य काॅंग्रेस कमेटीवर कार्यरत आहेत.संघटक पद हे अतिशय महत्त्वाचे असून अध्यक्ष,महासचिव पदानंतर या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

        वर्गवारी नुसार का होईना?पण,या पदाला गवसणी घालणे बऱ्याच जणांना जमत नाही.हे पद ओबीसी समाजाला जागरूक करुन त्यांना एकसंघ करणारे आहे.जर का ओबीसी समाज जागरूक व एकसंघ झाला तर त्या समाजाला हरविणारी दुसरी कुठलीच मनुष्य बळ शक्ती देशात नाही.एवढ्या मोठ्या सामाजिक शक्तीचे ते एका राष्ट्रीय पक्षातंर्गत संघटक असणे सर्वसाधारण बाब नाही..

      धनराजभाऊ शांत,स्वयंमी,मृदू भाषी व मनाधिराज्य आहेत हेच त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक आहे.

           अरविंदभाऊ रेवतकर म्हणजे एका विपरीत व कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत यशस्वी होणारे स्वावलंबी जीवन..

             तद्वतच ते चालते-बोलते कार्य व कर्तव्य आहेत.कोरोना कालावधीत त्यांनी जनतेच्या हितासाठी व सुरक्षासाठी केलेले कार्य अद्वितीय असेच होते.

            कोरोना काळात खिसातली फुटकी कवळी खर्च करायला कुणी तयार नव्हते अशा वेळी त्यांनी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू नये म्हणून मौजा भिसीसह अनेक गावात जंतू नाशक औषधांची फवारणी करुन त्या गावातील नागरिकांना दिलासा देणारे व भितीमुक्त करणारे महत्वपूर्ण कार्य केले होते.

          याच बरोबर त्याच काळात गोरगरीब उपवासी राहायला नको म्हणून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले,हे अरविंदभाऊ रेवतकरांचे हृदयस्पर्शी कार्य अनेकांच्या आयुष्याला नवसंजिवनी देणारे ठरले.

          पैसा येतो आणि जातो, मात्र ऐन महत्वाच्या वेळेत ज्यांच्या उत्तम कार्यभावान्वये मनुष्य प्राणी जगतो त्या सारखे योग्य कार्य दुसरे नाही.

         आजच्या स्थितीत ते कुठल्या पक्षात गेले हा महत्त्वाचा मुद्दा नाही,मात्र ते भिसीवासींयासाठी धडपडतात,त्यांचे हित जपू इच्छितात,त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात व सामाजिक कार्यासाठी उत्तम मनाने सहकार्य करतात,हे त्यांचे कार्य अतिशय संवेदनशील मनाचे असून लोकहितासाठी सार्थकी ठरणारे आहे.

       अरविंदभाऊ रेवतकर सुध्दा शांत,स्वयंमी तथा मृदू भाषी असून ते मनावर ताबा ठेवीत कर्तव्य पार पाडणारे दक्ष समाजसेवक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस आहेत.

           सदर दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी (नगरपंचायत) येथील रहिवासी आहेत.तद्वतच आपापल्या पक्षातंर्गत ते वरिष्ठ पदावर कार्यरत असल्यामुळे भिसीवासींयासाठी अपेक्षित व अनपेक्षित आधार स्तंभ आहेत हे फार कमी नागरिकांना कळलेले असेल.