नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली :- नंदलाल पाटील कागगते विद्यालय साकोली येथे आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के एस डोये तर प्रमुख अतिथी श्री एम टी कोचे ,एन पी बावनकर, सौ आर बी कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे हस्ते करण्यात आले.
शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली, संपूर्ण विद्यालयात स्वंयम:शासन चा कार्यक्रम करण्यात आले, त्यामध्ये विद्यार्थीच हे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका ,परिचर ही भूमिका योग्यरीत्या पार पाडून शाळेचा संपूर्ण व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते, शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे, भविष्यातले विचारवंत,कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर ,शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच आहे असे मौलिक विचार डोये सर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी *शिक्षक दिवस* हा मोठ्या उत्साहात साजरा केला, शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गीत,भाषणे व इतर कार्यक्रम सादर केले.
स्वयंम:शासन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उस्फूर्त असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या संचालन श्री आर व्ही दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ आर बी कापगते यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.