अमर जवान शहीद स्मारक येथे कारगिल दिवस साजरा…

चेतक हत्तीमारे 

 जिल्हा प्रतिनिधि 

लाखनी :- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व तारागोविंद बहुदेशीय संस्था तर्फे लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने ‘कारगिल शहीद दिवस’ अमर जवान शहीद स्मारक मानेगाव सेलोटी येथील पटाची दाण याठिकाणी साजरा करण्यात आला.

           यावेळी सुभेदार ऋषीं वंजारी व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह तसेच नगरपंचायत लाखनीचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने व ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक नंदेश्वर यांनी अमर जवान शहीद स्मारक येथे शहीद जवान प्रतिकृती समोर पुष्पचक्र वाहून कारगिल शहिदांना नमन केले. 

         यावेळी सुभेदार ऋषीं वंजारी यांनी कारगिल युद्धात घडलेल्या अनेक अविस्मरणीय घडामोडीचा उहापोह केला. 

        कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रीनफ्रेंड्सचे अशोक वैद्य,गुरुकुल आयटीआयचे विद्यार्थी अनिकेत ढवळे, मयूर ढवळे, साहिल ठाकरे त्याचबरोबर हरिदास सेलोकर, वर्षा सेलोकर, ज्योती गोटेफोडे, रूपा पाखमोडे, मंजुषा ग्रंथाडे, आरती कुरमते, सुलभा चानोरे, सरिता पाखमोडे यांनी सहकार्य केले. 

          ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे अमर जवान शहीद स्मारक येथे कारगिल दिवस, लाखनी निसर्गमहोत्सव तसेच वनमहोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम परिसरात घेण्यात आला.

          कार्यक्रम आयोजनाकरिता नगरपंचायत लाखनी माझी वसुंधरा 5.0 उपक्रमाचे तसेच पर्यावरण व स्वच्छता विभागाचे कोऑर्डिनेटर लीना कळंबे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा गोंदिया पर्यावरण विभाग, नेफडो जिल्हा शाखा भंडारा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरिकर ,सिद्धिविनायक हॉस्पिटल चे डॉ. मनोज आगलावे, गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, नगरसेवक संदीप भांडारकर, महाराष्ट्र प्लास्टिक सेंटरचे अनिल बावनकुळे, नाना वाघाये, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रजत अतकरे, ऋतुजा वंजारी, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, से. Baar. महसूल निरीक्षक, गोपाल बोरकर,से.नि. प्राचार्य अशोक हलमारे, ग्रीनफ्रेंड्सचे निसर्गमित्र पंकज भिवगडे,मयूर गायधने, सलाम बेग, धनंजय कापगते, दर्वेश दिघोरे, सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.