नरसिंहपुर गावातील सर्व महिलांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा :- आमदार दत्तात्रय भरणे

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनीधी 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निरा नरसिंहपुर येथे शुभारंभ झाला.

           निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील सभा मंडपामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

           यावेळी त्यांच्या समवेत तहसीदार श्रीकांत पाटील, तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, नरहारी काळे, सरपंच आर्चना सरवदे, सरपंच नितीन सरवदे, श्रीकांत दंडवते, जगदीश सुतार दशरथ राऊत अरुण शिरसागर समाधान सरवदे मधुकर सरवदे अमोल भोसले पांडुरंग मोरे,  आशा शिविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी सह महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

           आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेची माहती महिलांना सांगीतली व शासकिय योजनांचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा आसेही आवाहन केले आहे.

           आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केलं त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना आमलात आणली सरकार सर्व स्तरातील जनतेला एकत्रित घेऊन काम करीत आसल्याचीही त्यांनी ग्वाही दिली, आनंद द्या आणि आनंद घ्या हा ही मूलमंत्र ग्रामस्थांना दिला.

            तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन करून महिलांच्या शंकेच निरासन केले. फॉर्म भरताना महिलांना कोणत्याही आडचणी येऊ देऊ नयेत, तसेच रेशन कार्ड असेल तेही दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. 

          या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन माजी सरपंच नरहरी काळे, नरसिंहपूरचे विद्यमान सरपंच आर्चना सरवदे, सरपंच नितीन सरवदे, जगदीश सुतार, दशरथ राऊत, सह सर्वजन नरसिंहपुर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

            निरा नरसिंहपुर येथील सर्वच महिलांनी कार्यक्रमाला उस्फृत प्रतिसाद दिला व महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले.

            कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच नितीन सरवदे यांनी मानले.

चौकट

            मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे 85 टक्के काम पूर्ण झाल्यामुळे सरपंच नितीन सरवदे यांना शाब्बासकी देऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कौतुक केले.