शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त करा.. — महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे वन अधिकाऱ्यांना निवेदन…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

           चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव वन्यजीव संघर्ष वाढत असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना 4 जुलैला घडली आहे. 

          त्यात गरडापार,किटाळी,उरकुडपार,नवेगाव येथील गावातील शेतकरी असून या गावामधील नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

           त्या अनुषंगाने आज दिनांक 5 जुलैला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव साईश सतिश वारजूरकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिमूर येथे जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त करण्याचे निवेदन दिले. गरडापार गावात जावून गस्तीवर असेलेले वनपरिक्षेत्र अधिकारी देउळकर व नागरीक यांच्याशी सवांद साधला आहे.

      यावेळी युवक काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष रोशन ढोक, तालुका सरचिटणीस विलास मोहीनकर युवक काँग्रेसचे विधान सभा उपाध्यक्ष प्रशांत डवले,युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहन नन्नावरे, अक्षय लांजेवार, अक्षय नागरीकर, राहुल पिसे,अमित मेश्राम, सौरव जस्वाल आदी काँग्रेसचे पदाअधिकारी उपस्थित होते.