ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली ( आय.टी. आय ) ही संस्था १९९५ पासुन विविध व्यवसायात प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य विकास करीत आहे.
सद्यस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे एकूण ९ व्यवसाय सुरु आहेत. यात विजतंत्री, तारतंत्री, जोडारी, कातारी, मेकॅनिक मोटर व्हेहीकल, संधाता, कॉम्पयुटर ऑरपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असीस्टंट, ड्रेस मेकिंग, डेस्कटॉप पब्लीशींग ऑपरेटरयांचा समावेश आहे.
प्रवेश सत्र ऑगस्ट २०२० ला कॉम्पयुटर ऑरपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असीस्टंट या व्यवसायाकरीता भुपेश व्यंकट थेर ब्राम्हणटोला ( बाराभाटी ) तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथिल प्रशिक्षणार्थी प्रवेशीत झाला होता.
यावेळी कॉम्पयुटर ऑरपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असीस्टंट या व्यवसायाकरीता सतीश रमेश आठवले, शि. नि. कोपा हे प्रशिक्षक होते. जागतीक कौशल्य स्पर्धा चिन शांघाय 2022 करीता नोंदणी प्रक्रिया साधारणत एप्रिल २०२१ पासून सुरु झाली होती.
सदर स्पर्धेकरीता भुपेश व्यंकट थेर याची IT Network Cabling या कौशल्याकरीता नोंदणी करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये जिल्हा स्तरीय स्पर्धा झाली. त्यात भुपेश हा विभागीयस्तर स्पर्धेकरीता पात्र ठरला. ऑगस्ट२०२१ मध्ये विभागीय स्पर्धा मुंबई येथे घेण्यात आली. त्यात भुपेश हा राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरला. राज्यस्तरीय स्पर्धा सप्टेंबर 2021 मध्ये घेण्यात आली. त्यात भुपेशला रौप्य पदक मिळाले.
दरम्यान जागतीक कौशल्य स्पर्धा २०२४ ला फ्रांस लिओन करीता नोंदणी प्रक्रिया साधारणता डिसेंबर२०२३ पासून सुरु झाली. सदर स्पर्धेकरीता भुपेश व्यंकट थेर याची IT Network Cabling या कौशल्याकरीता श्री आठवले सर यांचे मार्गदर्शनाखाली नोंदणी करण्यात आली.
राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास परीषद यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार online pre-screening test, Cluster Level competition आणि राज्यस्तर स्पर्धा घेतल्या. या सर्व स्पर्धा आयोजनाकरीता Confederation of Indian Industry (CII) यांचेकडे जबाबदारी देण्यात आलेली होती.
सदर स्पर्धेकरीता चाळणी परीक्षा, क्लस्टर थेअरी व प्रात्यक्षीक परीक्षा उत्तीर्ण करुन भुपेश राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरला. दिनांक १९ व २० मार्च २०२४ रोजी Don Bosco Industrial Training Institute मुंबई येथे ६२ स्कील्स मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये भुपेश थेर याने पुन्हा IT Network Cabling या स्कीलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिकले व तो पुढच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरला. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दिल्ली, बंगलोर व गांधीनगर या ठिकाणी करण्यात आले.
भुपेश याची स्पर्धा दिल्ली येथे होती. सदर स्पर्धा ही राष्ट्रीय असल्याने संपुर्ण भारतामधून विविध राज्यातून सुवर्ण पदक जिकलेले स्पर्धक यांच्यात स्पर्धा होती. सदर स्पर्धा ह्या दि १३ ते २० मे दरम्यान घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भुपेशने खुप मेहनत घेतली. परीणामी त्याला Medallion for Excellence ला हे मेडल प्राप्त झाले.
भुपेश आंतराष्ट्रीय स्पर्धेकरीता पात्र ठरला नाही परंतु त्याने संपुर्ण योगदान स्पर्धेमध्ये दिले. विशेष म्हणजे भुपेश हा Advanced Diploma (Vocational) IT, Networking and Cloud Computing या अभ्यासक्रमात २ वर्षे पुर्ण करुन तो टॉप ४ रँक मध्ये आला आहे व त्याची निवड IBM Internship Program करीता झालेली आहे व तो Internship करीता रुजु झालेला आहे.
भुपेशची आतापर्यंतची कारकीर्द बघता असे दिसून येते की, एका छोटयाशा खेडेगावातून शिक्षण घेतलेला मुलगा, घरची परिस्थिती सामान्य शेतीवर आधारीत तरीही शासकीय औ. प्र. संस्थेतून प्रशिक्षण घेवून या छोट्रयाश्या शिदोरीवर त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त तर केलेच आहे पण आता IBM Internship Program मध्ये सुध्दा निवड मिळवून त्याने पुढचा प्रवास सुरु केलेला आहे.
सदर प्रवासात त्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले सतीश आर. आठवले शि. नि. कोपा यांचा मोलाचा वाटा आहे. तत्कालीन प्राचार्य आर. एस. जाधव यांची सुध्दा वेळोवेळी मदत मिळालेली आहे. एकुणच काय तर शासकीय औ. प्र. संस्थेचे प्रशिक्षणार्थी हे कोणत्याही स्तरावर यशस्वी होवू शकतात हे भूपेश याने सिध्द करुन दाखविले आहे.