बाबुळवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी अन्वये मेळावा संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील बाबुळवाडा जि.प प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी अन्वये दुसरा मेळावा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अर्चनाताई भागडकर यांच्या अध्यक्षते खाली,माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य सौ.मायाताई इंद्रपालजी गोरले,पारशिवनी पं.स.चे विषयतज्ञ श्री गौरीशंकर ढबाले,मुख्याध्यापक उमाकांत बांगडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

        या प्रसंगी शाळेत सामाजिक व भावनिक विकास,भाषा नोदणी,शरीरिक विकास,बैद्धिक विकास,भाषा विकास,गणना पूर्व,आणि साहित्य वाटप व मागदर्शन यांचे विषया बद्दल अन्य टेबल लावुन उपस्थितीना आर्कषित करीत माहिती देण्यात आली.  

        कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका श्रीमती शिलाबाई अलोने,मदतनिस कु.भाग्यश्री पाकळे,सौ.अश्विनी वाघाडे, कविता सोनवने पुजा दुनेदार करिश्मा झुरे विद्या बावनकुळे आशा वाघाडे तसेच माता पालक,महिला युवक विद्यार्थी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.सारिकाताई भोयर मँडम यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उमाकांत बांगडकर यांनी केले.