ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – येथील पंचशील वार्डात असलेल्या प्रसिद्ध नवदुर्गा मंदिरात शिवलिंग नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 4 जुलै ते 8 जुलै पर्यंत करण्यात येत आहे.
दिनांक ४ जुलैपासून सुरू झालेल्या या पाच दिवसीय सोहळ्यात रोज सकाळी 8 वाजता जलाधिवास, अन्नधान्यधिवास,पंचामृताधिवास, फळफुलाधिवास व 8 जुलैला वस्त्राधिवास तसेच गावातील प्रमुख मार्गाने भजनी मंडळ गावकरी भक्तगणासह प्रभात फेरी व दुर्गा मंदिरात प्राणप्रतिष्ठा,हवन, मूर्ती स्थापन, पूर्णाहुती विधी, नैवेद्य व प्रसाद वितरण पंडित वैष्णवाचार्यजी, पंडित पुष्पेंद्र दानाचार्यजी, वैदिक पंडित अनमोल कृष्ण पांडेजी महाराज व त्यांचे सहयोगी ब्रह्मरवृंद वृंदावन मथुरा यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होईल.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ नंदागवळी, सचिव बापूसाहेब अवचटे, कोषाध्यक्ष तुळशीराम मुटकुरे,विठोबा साठे, प्रभाकर सपाटे ,केशव परशुरामकर, केशव चुटे,हरिष पोगडे, किशोर पोगडे, रवी माकोडे ,राघव ईसापुरे, जनार्दन गजापुरे,मधुकर डुंभरे व आजीवन सदस्यांनी केले आहे.