चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(लाखनी):- स्थानिक लाखांदूर तालुक्यातील आदर्श विद्यालय पारडी येथे गणित विषय अध्यापक भीमराव ढेकलू भोवते यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा रामकृष्ण मंगल कार्यालय लाखनी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषद माजी उपाध्यक्ष के डी बोपचे व प्रमुख अतिथी मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय, चिचाळ, बि एन अंबादे व अर्जुन तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी भोवते व केंद्रप्रमुख सरोज भोवते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. मुनिश्वर भोवते नागपूर यांनी आपल्या मनोगतात दोघांचेही स्वभाव मनमिळाऊ आहेत असे ते या प्रसंगी बोलत होते. दोघांनीही केलेल्या कार्यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण झाले. सर्वांनी त्यांच्या भावी आयुष्याबद्दल व शारीरिक तंदुरुस्ती बद्दल सदिच्छा व्यक्त केले. यावेळी भोवते यांचे सर्व आप्तपरिवार व मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी कुमारी प्राची भोवते, प्राजक्ता भोवते, प्रांजली भोवते, श्रेया भोवते, श्रुती भोवते, शिल्जी भोवते व सुदत्त भोवते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सतीश भोवते यांनी केले.