अकोट प्रतिनिधी
गेल्या एक ते दिड महिन्या पासुण स्थानिक खानापूरवेस भिमनगर येथिल पुलाचे बांधकाम हे करण्या करिता सदर चांगल्या पुलाला पाडुण ठेवन्यात आले आहे एक ते दिड महिन्या च्या पेक्षा जास्त कालावधी झाला, परंतु अद्याप पर्यंत या पुलाच्या बांधकामा कडे अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता (Engineer) यांनी मात्र डोळे बंद करुण बासल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितित सम्बंधित मार्ग सुद्धा बंद झाले आहेत व मोठे गड्डे मात्र अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता (Engineer) यांनि आदेश देऊन खोदायचे काम करण्यास सांगीतल्याचे चित्र यावरून मोफत पाहावयास भेटत आहे.
चारही बाजुनी रस्ता बंद क़ेल्या मुळे नागरीकांनी कोठुन जावे असा प्रश्न निर्माण होत काही लोक आपला जिव मुठित घेऊण या खड्डयामधुन कसरत करत आपला मार्ग काढतात, कारण पर्यायी मार्ग हा काढलेला नाही. हे मात्र लज्जास्पद रस्त्याचे किंवा पुलाचे बांधकाम सुरु आसतांना खबरदारीचे फलक सुद्धा याठिकानी लावन्याय आले नाही. सदर बांधकाम जोपर्यंत मनुष्य बळी मागत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही असे अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता यांचे मनावरुण दिसत आहे. तसेच नगर परिषदेचे भोंगळ कारभार यावरुन दिसतात. नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष या कामावर होत आहे म्हनुण येत्या ३ दिवसाचे आत नगरीकांना पर्यायी मार्ग काढ़ून पुलाचे बांधकाम त्वरित सुरु करावे अन्यथा दि. ०८/०७/२०२२ ला युवक कॉग्रेस च्या वतिने अकोट नगर परिषदेवर विविध आंदोलन करण्यात येणार व संबंधित अधिकारी यांना काळे फासन्यात येणार असल्याचे युवक कॉग्रेस चे माजी निरीक्षक मिलिंद नितोने यांनी सांगीतले. सदर आंदोलनाला कॉग्रेस ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकर युवक कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष निलेश आग्रे कॉग्रेस ब्रिगेड चे शहर अध्यक्ष विवेक सरदार व समस्त अकोट युवक कॉग्रेस चे पदाधिकारी व सदस्य करणार असल्याचे मिलिंद नितोने यांनि सांगीतले.